चर्चा:गंगाधर गाडगीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Untitled[संपादन]

गंगाधर गाडगीळ यांसंबंधी विविध वृत्तपत्रात लिहून आलेला मजकूर एकत्र करून हा लेख बनवण्यात येईल. मात्र असे करताना विविध वृत्तपत्रांमधील माहितीत भयानक विसंगती आढळून आल्याचे खेदपूर्वक नमूद करावे लागत आहे. :-( गाडगीळांची पहिली कथा महाविद्यालयात असताना १९४१ ला छापून आली असताना महाराष्ट्र टाईम्सने मात्र पहिली कथा छापून येणे आणि नरसी मोनजी कॉलेजचे प्राचार्यपद भूषवणे या घटना एकाच साली १९४१ साली दाखवल्या आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3485875.cms"

एखाद्या लेखकाच्या निधनानंतर त्याची कारकीर्द देताना अशा चूका करणे अक्षम्य आहे. वर्तमानपत्रातील मजकूरही अचूक नसण्याचे हे चांगले उदाहरण आहे. तरी त्यातल्या त्यात सकाळमध्ये छापून आलेले अल्पचरित्र पुरेसे विश्वासार्ह वाटते.

सदस्यांनी आपापली मते मांडावीत. सौरभदा ०५:३५, १७ सप्टेंबर २००८ (UTC)