चर्चा:खानापूर (विटा)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांगली जिल्ह्यातील विटा हे शहर पुरातन कालीन आहे. शिवाजी महाराजांची पाचवी पत्नी राणी सकवारबाई येथे वास्तव्यास होती. विटा शहराच्या मध्यभागी राणीचा एक वाडा होता तो आता अस्तित्वात नाही, त्याच्या बाजूला चार तटबंद बुरूज होते, कालांतराने ते बुरूज पडले/पाडले गेले.. त्यामधील एक बुरूज पाडून 1983/84 साली शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा ऊभारला गेला.. दुसरा बुरूज हा मांगवाड्याला लागून होता..2016/17 साली तो बुरूज पाडला व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक बांधण्यास बुरूजाची जागा वापरण्यात आलेली आहे.. अजुन एक बुरूज पडला साल माहीत नाही त्या जागी जुनी नगरपालीका बांधली होती ती पण पाडली गेली.. राणीच्या वाड्याला लागून प्यायच्या पाण्याची खुप मोठी विहीर होती सध्या ती अस्तीत्वात आहे पण त्यावर बँक बांधली आहे... विटा शहरात काही मंदीरे खुप जुनी आहेत त्यामधील विटे शहराचे दैवत भैरवनाथ हे आहे..या शहराला सुवर्ण नगरी अस ही म्हणतात(शुभम)