चर्चा:कृष्ण सरस्वती दत्त महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काव्यरचना[संपादन]

विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे येथे नोंदवल्याप्रमाणे विकिपीडिया ही स्रोतवाङ्मय लिहिण्यासाठी अभिप्रेत नाही. त्यामुळे हे लिखाण मराठी विक्रोतावर यथावकाश हलवावे. तूर्तास ते येथे चर्चापानावर खाली चिकटवून ठेवत आहे.

  • स्तुति :

दत्तात्रयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> ब्रह्मसनातन सद्गुरुमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> करवीरग्रामी अवतरले यति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> हनुमत्स्वरुप अवधूत मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> समर्थस्वामीगुरु अभेदमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> ब्रह्मानंदीनित बालवृत्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> हास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> कस्तुरीतिलक सुशोभित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> मौक्तिक माला विलसित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> गूढ मितबोली चाल चपळ गति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> वैराग्यमठी संजीवनस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> निजबोधमठी गुंजारव गीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> षडरिपुनाशक हारक भवभीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> सच्चिदानंददायक किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> भक्तपालक दायक मुक्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> स्मरणे अर्पित सहजी निजस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> कृपावंत अति अगाध किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> कृष्णदास शरण आर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\> निशिदिनी गातो तव गुणकिर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती<br\>

  • प्रार्थना :

नांदणीग्रामी जोशीवंशी अवतरलासी तू देवा<br\> श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नाम तुज गुरुदेवा ॥<br\> अप्पा अन्नपूर्णा सुत हा झालासी तू देवा<br\> अजन्मा ऐसा भक्त काजा अवतरलासी देवा ॥<br\> बालवयातचि गुरुदर्शना त्यागिलेसी गृह विभवा<br\> अक्कलकोट स्वामीराये तुजसी, अंगिकारिले देवा ॥<br\> करवीरक्षेत्र अवधूतक्षेत्र, वसलासी तेथ देवा<br\> श्रीपादयति तू नृसिंहयति तू अवधूतचि तू बरवा ॥<br\> सुरवरा वंद्य गुरुराज दत्त तू आला करवीर गावा<br\> शिर्केभुवनी निवास केला देखुनि ताराईच्या भावा ॥<br\> शुभ्र अंगरखा हिरवी टोपी उपरण्याचा रंग भगवा<br\> कस्तुरी टिळा शोभे माथा हास्य लोभवी जीवा ॥<br\> बालभाव सोंग घेवुनि दाविले अगणित लीला विभवा<br\> कुंभार आळी वसुनि धरिसी कुंभार स्वामी उपनावा ॥<br\> वैराग्यमठी अन् निजबोधमठी भक्तजन करिती तुझाचि धावा<br\> दर्शना येती भक्त त्यांसी अर्पिले वैराग्य विभवा ॥<br\> वासनांचा कोष सभोवती करी जीवा शिवा दुरावा<br\> नाश करण्या समर्थ तुजविण ना दुजा कुणी गुरुदेवा ॥<br\> षड्‌रिपुंचा नाश करुनिया निर्मळ केले जीवा<br\> माया मोह नाश करुनिया फास तोडिला देवा ॥<br\> जीवासी ज्या अंगिकारिले, भेटविले तू शिवा<br\> बद्ध जीवांसी मुक्त करुनिया दाविलेसी निजठावा ॥<br\> मर्त्य जीवांसी निजबोधुनिया अमर केलेसी देवा<br\> नामाची तव अखंड वीणा मठी करी गुंजारवा ॥<br\> भक्तकाजा धावलासी तू देखुनि शुद्ध भावा<br\> उद्धरिलेसी अनंत अगणित भक्तजन गुरुदेवा ॥<br\> शुद्ध मति दे मजसी गावया तव अगणित किर्ती विभवा<br\> नाम गानी अन् ध्यानी रमता होवो ब्रह्मानंद जीवा ॥<br\> विश्‍वी जे जे रुप दिसे ते भास तुझाचि व्हावा<br\> द्वेष मत्सरा थारा न मिळो अशा रिती मज ठावा ॥<br\> कायावाणी मनासहित मज पवित्र करा हो देवा<br\> विकल्प दवडुनि अज्ञ मनाचे दृढ करी गा भावा ॥<br\> चंचलता सारुनि दूर आघवी स्थिर करा हो देवा<br\> भावभक्ति अन् विवेकवैराग्य लेणे मज लेववा ॥<br\> पावन सुमंगल तव नामाची ललकार अंतरी उठवा<br\> भावभक्तीच्या आनंदाच्या डोही मज त्या रमवा ॥<br\> स्मरणी चिंतनी रमता तव या काळाचेही भान नुरवा<br\> दिक्कालातीत सच्चिदानंद स्वरूप मजसी दावा ॥<br\> कृपादृष्टी अन कृपाहस्त तव मजवरी सत्वरी उभवा<br\> मानवत्व ते देवत्वाचा प्रवास मजसी घडवा ॥<br\> जन्मोजन्मी दास तुझाचि परि कदापि विसर न व्हावा<br\> विश्‍वव्यापक तू भरला अणूअणू प्रचित मजसी दावा ॥<br\> दास दास मी तव अखंड गाता संसाराचे भान नुरवा<br\> मी तू पण लोप करुनिया द्या एकत्वाचा अनुभव बरवा ॥<br\> काय काय अन् किती ते मागू अंतरीची आस मिटवा<br\> स्वामी तू मी दास तुझाचि मज दासभावे विनटवा ॥<br\> समर्थ स्वामी शरणागत या दासावरी करी तव किमया<br\> साच दासभाव हा येण्या निभण्या दे सामर्थ्य जीवा ॥<br\> शरीर त्यागिलेसी जरि तू विश्‍वाकार देवा<br\> भक्त हृदयी निवास अखंडित कार्या तव न विसावा ॥<br\> कृपाळू तू स्वामी जाणुनि दास मागतो मी जोगवा<br\> करी बा जैसे मनी तव तैसे दासा काही न ठावा ॥<br\> कृष्णदास हा करी विनवणी, अंगिकारा गुरुदेवा<br\> ध्यास तुझा मज लागो निशिदिनी, द्या अंती चरणी विसावा ॥<br\>

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३३, २२ जून २०११ (UTC)