चर्चा:काशीराम पावरा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काशिराम वेचाण पावरा हे मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. त्यांचे पूर्वज वन जमिनीच्या शोधात राजवाडा (मध्य प्रदेश) मधून आंग्रेस (महाराष्ट्र) येथे येऊन स्थायिक झालेत. मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर वसलेल्या सुळे (ता. शिरपूर जि. धुळे) येथील रहिवासी झाले. महाराष्ट्रात पावरा समाजाचे ते पहिले आमदार आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते महाराष्ट्र विधानसभेवर शिरपूर या प्रथमच आदिवासींसाठी (अनुसूचित जमात) राखीव झालेल्या मतदारसंघातून आ. पावरा निवडून आले आहेत.