चर्चा:कर्‍हाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कर्‍हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. कर्‍हाड या गावाच्या नावाचा कर्‍हा या नदीशी काहीही संबंध नाही. कर्‍हा ही नदी पुणे जिल्ह्यातून वाहते. तिच्या काठावर जिल्ह्यातली सासवड आणि बारामती ही दोन प्रमुख गावे आहेत. सासवड हे आचार्य अत्र्यांचे मूळ गाव. लेखक-नाटककार-कवी-वक्ते असलेल्या अत्र्यांच्या आत्मचरित्राचे नाव कर्‍हेचे पाणी असे आहे. बारामती हे राजकीय नेते असलेल्या शरद पवारांचे गाव, तर कराड/कर्‍हाड हे यशवंतराव चव्हाणांचे.

कर्‍हा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीला मिळते आणि संपते. ती पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या सातारा किंवा आणखी दक्षिणेच्या सांगली जिल्ह्यात प्रवेश करत नाही.


कऱ्हाड आणि कर्‍हाड या दोन शब्दांचा उच्चार सारखा नाही, त्यामुळे, कर्‍हाड असे लिहिणे चुकीचे आहे. पानाचा मथळा बदलून ’कऱ्हाड ’ करण्यात यावा. .....J (चर्चा) १७:०२, १९ मार्च २०१३ (IST)