चर्चा:इबोला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:इबोला विषाणू रोग या पानावरून पुनर्निर्देशित)

वगळला गेलेला आधीचा मजकुर आवश्यकते नुसार पुर्नउपयोगासाठी वापस आणला[संपादन]

इबोला हा जगातला सर्वात जिवघेणा रोग आहे. जगभरात सध्या इबोला व्हायरसची भीती पसरली आहे. या रोगाने पश्चिम अफ्रिकेत धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत इबोलामुळे १६०० पेक्षाही जास्त लोकांचा म्रुत्यु झाला आहे.

संसर्ग[संपादन]

जनावरांमार्फत माणसांना इबोला चा संसर्ग होतो. जनावरांचे रक्त, मांस, मलमूत्र इत्यादींचा माणसाशी संपर्क आला, तर इबोलाच्या संसर्गाची शक्यता वाढते. तसेच ज्या व्यक्तीचा इबोलाने म्रुत्यू झाला असेल, त्याच्या रक्तशी संपर्क आल्यास इबोलाचा संसर्ग होतो.

लक्षणे[संपादन]

१. ताप, नाका- तोंडातून रक्त येणे. २. लगेचच स्कीन इन्फेक्शन होणे. ३. अंगावर पुरळ येणे. ४. डोळे येणे, तोंड येणे. ५. जननेंद्रियांवर सूज येणे.