चपराळा वन्यजीव अभयारण्य
Appearance
चपराळा वन्यजीव अभयारण्य हा चपराळा गाव मध्ये स्थित आहे. सदर अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ८० कि.मी. व आष्टीपासून १० कि.मी. अंतरावर चपराळा अभयारण्य आहे. या अभयारण्याला "प्रशांतधाम" या नावानेही ओळखले जाते. हा परिसर आलापी वन विभागात येतो.[१]
भौगोलिक आणि वन्यजीव
[संपादन]चपराळा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचना क्रमांक डब्ल्यूएलपी. १०८५ /प्र.क्र. ७५/फ-५ नुसार २५ फेब्रुवारी १९८६ रोजी झाली. वन्यजीव अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १३४.७८ चौरस किलोमीटर आहे.[२] आणि संरक्षित क्षेत्रात स्थलांतरित आणि जलचर पक्ष्यांसह सस्तन प्राण्यांच्या सुमारे ३९ प्रजाती आणि पक्ष्यांच्या सुमारे १९३ प्रजातींसह, मोठ्या संख्येने प्राणी आणि अनेक प्रजातीच्या वनस्पती आहेत.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Mawa Gadchiroli Zilla" (Marathi भाषेत). 25 October 2022.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "चपराळा" (PDF). moef.gov.in (Hindi भाषेत). 25 October 2022. 25 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 25 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "वन पर्यटन ; चपराळा अभयारण्य". loksatta.com (Marathi भाषेत). 12 July 2017. 25 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)