चंचुपात्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंचुपात्र

चंचुपात्र हे एक खूप साध्या प्रकारचे काचेचे पात्र असते जे तरल पदार्थ ढवळण्यास, मिश्रण करण्यास व ते गरम करण्यास सामान्यपणे अनेक प्रयोगशाळांत वापरले जाते. हे पात्र काचेचे असून दंडगोलाकार असते. ठेवलेल्या ठिकाणी न लवंडता नीट उभे रहावे म्हणून त्याचा तळ सपाट असतो. यातील बहुतेक प्रकारांना एक चोच अथवा चंचू असते, ज्यायोगे त्यातील तरल पदार्थ ओततांना ते सांडत नाहीत व त्याची धार पडते. या पात्राची धारण क्षमता उपयोगाप्रमाणे एक मिली ते अनेक लिटर्सपर्यंत असू शकते.