घोषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

घोषा ही प्राचीन भारतातील स्त्री तत्त्वज्ञ होती. ती दीर्घतमस याची नात तर काक्षिवत याची कन्या होती. या दोघांनीही अश्विन कुमारांच्या (दैवी वैद्यांचे जुळे) कौतुकाची सूक्ते रचली आहेत.[१]

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील दोन सूक्ते (क्र. ३९ व ४०) ही घोषाने रचल्याने मानले जाते. पहिल्या सूक्तात अश्विनांची स्तुती आहे तर दुसर्‍या सूक्तात तिच्या वैयक्तिक इच्छांचा उल्लेख आहे.

सूक्तांनुसार घोषाला कुष्ठरोगामुळे विद्रूपता आलेली होती.[२] उतारवयात अश्विन कुमारांनी तिची व्याधी दूर करून तिला आरोग्य, तारुण्य आणि लावण्य दिले. त्यामुळे तिचा विवाह होऊ शकला.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Vedic Women: Loving, Learned, Lucky!". Retrieved 2012-11-04.
  2. ^ Mahendra Kulasrestha (2006). The Golden Book of Rigveda. Lotus Press. p. 221. ISBN 978-81-8382-010-3.
  3. ^ Vettam Mani (1975). Puranic encyclopaedia. Motilal Banarsidass. p. 291. ISBN 978-0-8426-0822-0.