घोगस पारगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घोगस पारगाव हे शिरूर कासार तालुक्यातील बीड जिल्हयातील गाव आहे.

स्थान[संपादन]

अक्षांश १८.९६ रेखांश ७२.८२ . मुख्ये डाक कार्यालय उमापूर हे असून पिन कोड नं. 431130 आहे. पूर्वेस बीड ,गेवराई तालुका ,पश्चिमेस पाथर्डी तालुका,उत्तरेस शेवगाव,पैठण तालुका,दक्षिणेस पाटोदा तालुकाची हद्द आहे. जवळपास असणारे शहरे पाथर्डी, शिरूर कासार पैठण ,अहमदनगर औरंगाबाद,बीड ,गेवराई इत्यादी.

इतिहास[संपादन]

फार प्राचीन खेडेगाव आहे.फार फार वर्षापूर्वी येथे घोगसराजा नावाचा राजा होता,त्यावरून या गावास घोगसपारगाव हे नाव पडले आहे.गावाच्या उत्तरेस कुमांडलेश्वर नावाचे तीर्थक्षेत्रआहे यावरून या गावास कुंडलपारगाव म्हणून सुद्धा ओळखले जाते.गावामध्ये प्रवेश करताना वेशीमध्ये उजव्या बाजूस प्राचीन हेमाडपंथी शंकराचे मंदिर आहे त्याचे जागेश्वराचे मंदिर व डाव्याबाजूस महालक्षमी मातेचे मंदिर आहे.भगवानगड या तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी हे गाव वसलेलेआहे.तसेच पश्चिम - उत्तरेस ५ कि.मी.अंतरावर केदारेश्वर हे एक तीर्थक्षेत्र आहे तेथे रामाने बाणमारून पाणी काढले आहे येथील नदीला पाताळगंगा हे नाव आहे. राम,सीता यांनी चौदा वर्ष वनवासात येथे वास्तव्य केले होते आशी आख्यायिका आहे, त्यांचे काही भांडीकुंडी येथे आजही पहावयास मिळतात.

भाषा व लोकजीवन[संपादन]

बोलीभाषा मराठी व राहनीमान सर्वसाधारण आहे.गावातील लोकांचा मुख्ये व्यावसाय शेती हा आहे.घोगस पारगांव येथिल पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकांती, शेती हा प्रमुख व्यवसाय मत्र अवेळी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती,ऊस तोड कामगार वर्ग असे हालाकिचे जीवन येथील लोक जगतात.

अर्थव्यवस्था[संपादन]

मुख्य शेती वरच अवलंबून आहे आणि शेती पावसावर म्हणून गावातील बरेचसे लोक ऊस तोडणीला जातात

पिण्याचे पाणी[संपादन]

पावसाळ्यातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन न केल्याने उन्हाळ्यात पाण्याच प्रचंड प्रमाणाते दुर्भिक् जाणवते.

शैक्षणिक सुविधा[संपादन]

गावातच जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे आणि इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत माध्यमिक शाळा आहे. गावात 11वी 12वी उच्च माध्यमिक विद्यालय आहे आणि अजून एक निवासी माध्यमिक विद्यालय आहे

आरोग्य सुविधा[संपादन]

आरोग्य सुविधांची तर फक्त नावालाच आहेत गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण ते कायमच बंद असतें

संचार सुविधा[संपादन]

संचार सुविधा बऱ्यापैकी आहेत जवळपास सगळ्याच मोबाईल कंपनीच्या मोबाईल मनोरे गावामध्ये आहेत.

पैठण पंढरपूर राज्य महामार्गावरील एक महत्त्वाचे स्थान आहे