घटिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू विवाहाच्यावेळी लग्न घटिकेचा उल्लेख होतो. घटिका म्हणजे [वेळ] ही वेळ समजण्यासाठी व अचूक मुहूर्त साधण्यासाठी घरिकापात्राचा उपयोग केला जाई. एका मोठ्या घंघाळसदृश मोढ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये छिद्र पाडलेली वाटी सोडली जात असे या वाटीमध्ये हळूहळू पाणी चढून ती काठोकाठ भरल्यानंतर बुडत असे. याच क्रियेला घटका भरली असे म्हणत. एक घटका म्हणजे २४ मिनिटे. या प्रकारे अडीच घटका म्हणजे एक तास होत असे. अशा प्रकारे पुरातन काळातील वेळ सांगणारे तंत्र म्हणजे घटकापात्र. यावरूनच घड्याळ हा शब्द निघाला.

सूर्योदयानंतर किथी वेळ झाला हे पाहण्यासाठी सूर्योदय झाला की लगेच घटिका मोजायला सुरू करीत असत. या प्रकारची घटिकापात्रे मंदिरे/मशिदींमध्ये ठेवलेली असत.तसेच राजांच्या दरबारात वापरत व प्रत्येक घटकेची नोंद करण्यासाठी एक खास व्यक्ती नेमली जात असे. ही व्यक्ती दर अडीच घटकांनंतर म्हणजे दर तासाला टोल देत असॆ.