ग्लोरिया स्टाइनेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लोरिया स्टाइनेम (जन्म १९३४) या एक अमेरिकन स्त्रीवादी पत्रकार, लेखिका, समाज सुधारिका व कार्यकर्त्या आहेत. त्यांनी १९७१ साली अमेरिकेतली नॅशनल वुइमेन्स पॉलिटिकल कॉकस (स्त्रियांची राष्ट्रीय राजकारणी सभा) स्थापन केली. १९७२ साली त्यांनी “मिस” हे स्त्रीवादी नियतकालिक अमेरिकेत सुरू केले. स्टाइनेम यांच्या समाज सुधाराच्या कार्याला भारतात १९५७ च्या सुमारास सुरुवात झाली. तेव्हा त्यांनी भारतात देवकी जैन या भारतीय गांधीवादीस्त्रीवादी कार्यकर्त्यांबरोबर दोन वर्षे काम केले. स्टाइनेम यांची “आउटरेजियस ॲक्ट्स अँड एव्हरिडे रिबेलियन्स” (“प्रक्षोभक कृत्ये आणि सामान्य विद्रोह”, १९८३) व “रिव्होल्यूशन फ्रॉम विदिन” (“अंतरातून क्रांती”, १९९२) ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.