Jump to content

ग्रेटर लंडन काउन्सिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रेटर लंडन कौन्सिल या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रेटर लंडन काउन्सिल (जीएलसी) ही १९६५-८६ दरम्यान अस्तित्त्वात असलेली ग्रेटर लंडनची उच्च-स्तरीय स्थानिक सरकारी प्रशासकीय संस्था होती. पूर्वीच्या लंडन काउंटी काउन्सिलच्या (एलसीसी) ऐवजी निर्मित केलेल्या या महानगरपालिकावजा संस्थेच्या अधिकारात लंडन शहर व आसपासच्या प्रदेशाचा समावेश होता.

जीएलसीची स्थापना लंडन गव्हर्नमेंट अॅक्ट १९६३ द्वारा १ एप्रिल, १९६५ रोजी करण्यात आली होती. या प्रशासकीय क्षेत्रामध्ये एसेक्स काउंटी काउन्सिल, हर्टफोर्डशायर काउंटी काउन्सिल, केंट काउंटी काउन्सिल, लंडन काउंटी काउन्सिल, मिडलसेक्स काउंटी काउन्सिल आणि क्रॉयडॉन, ईस्ट हॅम आणि वेस्ट हॅमच्या काउंटी प्रशासनांच्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला.

१९८६मध्ये लोकल गव्हर्नमेंट अॅक्ट १९८५ द्वारे जीएलसी विसर्जित करण्यात आली आणि त्याचे अधिकार लंडन बरो आणि इतर प्रशासकीय संस्थांना देण्यात आले. २००० साली याला समांतर अशी ग्रेटर लंडन अथॉरिटी (जीएलए) ही एक नवीन प्रशासकीय संस्था स्थापन करण्यात आली.


संदर्भ

[संपादन]