ग्रेग मारिनोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ग्रेग मारिनोविच
Greg Marinovich 2011 Shankbone.JPG
छायाचित्र: डेव्हिड शॅंकबोन
पूर्ण नावग्रेग मारिनोविच
जन्म ८ डिसेंबर १९६२
स्प्रिंग्ज,दक्षिण आफ्रिका
कार्यक्षेत्र छायाचित्रकार, पत्रकार

ग्रेग सबॅस्टीयन मारिनोविच (जन्म: ८ डिसेंबर १९६२, स्प्रिंग्ज,दक्षिण आफ्रिका) हे एक दक्षिण आफ्रिकी पत्रकार व छायाचित्रकार आहेत, तसेच ते चित्रपट निर्मिती आणि छायाचित्र संपादन क्षेत्रातही आहेत. इ.स. १९८५ पासून ग्रेग हे छायाचित्रण क्षेत्रामध्ये आहेत. ते बॅंग-बॅंग क्लबचे एक सदस्य म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला काही वर्ष मुक्त छायाचित्रकार म्हणून काम केल्यानंतर, एप्रिल१९९६ ते ऑगस्ट १९९७ दरम्यान त्यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेतर्फे इस्राइल/पॅलेस्टाइन येथे मुख्य छायाचित्रकार म्हणून काम केले. १९९० ते १९९४ च्या दरम्यान मुक्त छायाचित्रकार म्हणून काम करताना त्यांनी काढलेली छायाचित्रे विविध वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केली, ज्यामध्ये टाईम साप्ताहीक, न्यूयॉर्क टाइम्स, असोसिएटेड प्रेस, न्यूजवीक इत्यादी वृत्तसंस्थांचा समावेश होतो. याच काळामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयांना समान मताधिकार मिळवून देण्यासाठीच्या चळवळी सुरू होत्या. या चळवळी दरम्यान हिसाचाराच्या घटना ही घडत होत्या. या चळवळींच्या छायाचित्रणाचे काम ग्रेग यांनी केले. हे काम करत असताना, १९९० साली ग्रेग यांनी लिंडसे त्शबालाला नावाच्या इंकाथा मुक्ती दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे छायाचित्र काढले. या छायाचित्रासाठी त्यांना १९९१ सालचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. याच कामकाजातील अनुभवांवर आधारित,"द बॅंग-बॅंग क्लब: स्नॅपशॉट्स फ्रॉम अ हिडन वॉर" नावाचे इंग्रजी पुस्तक त्यांनी २००० साली लिहीले, होआव सिल्वा हे या पुस्तकाचे सहलेखक होत.