Jump to content

ग्रामसेवक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा गावपातळीवर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो.

निवड

[संपादन]
  • शिक्षण

तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल, तर तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही ग्रामसेवक होण्यासाठी पात्र ठराल.

  • वयोमर्यादा

ग्रामसेवक होण्यासाठी तुमचं वय किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असणं आवश्यक आहे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील लोकांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेतही सवलत सरकारकडून दिली जाते.

  • परीक्षा

1.परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते. 2.ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात. 3.प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल. 4.परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. 5.तांत्रिक विषय सोडून बाकी विषयांचा दर्जा हा बारावी परीक्षेच्या समान आहे. फक्त तांत्रिक विषयाचा दर्जा कृषी पदविकेसमान आहे 6.परीक्षेचा कालावधी 02 तास आहे. 7.नकारात्मक गुणांकन पद्धती लागू नाही.

ग्रामसेवक होण्यासाठी तुम्हाला खालील पायऱ्या पार करणं आवश्यक आहे, तरच तुमची ग्रामसेवक पदांवर नियुक्ती करण्यात येईल.

ग्रामसेवक होण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल, जर तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झालात तरच तुम्हाला सरकारकडून ग्रामसेवक बनण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सरकार तुम्हाला बीपीएल अंतर्गत 100 लोकांना जोडण्याचं काम देते. हे प्रशिक्षण 6 महिन्यांचं असतं. त्यानंतर तुम्ही ग्रामसेवक होता.

कामे

[संपादन]

1. कर वसुली करणे, 2. वसुलीतून गावविकासाची कामे करणे, 3. पाणीपुरवठा व्यवस्थापन, 4. साफ सफाई व्यवस्थापन, 5. शिक्षण व आरोग्य व्यवस्थापन, 6. दिवाबत्ती, इत्यादी कामे करणे, 7. जन्म-मृत्यू नोंदणी करणे, 8. विवाह नोंदणी करणे, 9. ग्राम पंचायत व ग्रामसभेत सचिवांची भुमिका बजावतात, 10. लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहचवणे, 11. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामे पार पाडतात, 12. ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे व हिशोब सांभाळणे अशी जवळपास 29 खात्यांची कामे असतात तसेच विविध योजना राबविणे. उदा.

1. महानरेगा 2. स्वच्छ भारत मिशन 3. 14वा वित्त आयोग. 4. प्रधान मंञी आवास योजना 5. स्मार्ट गाव 6. ग्राम सभा सचिव ORDP. DWSY. IAY.RAY.PSGSY.SGGSA.SSA.YGPA.MGTG.KKY.माहिती करिता मु.गा.अ.१९५८ वाचा

निवृत्ती

[संपादन]

ग्रामसेवक (ग्रामविकास अधिकारी) वयाच्या ५८ व्या वर्षी पदावरून निवृत्त होत असतो.

ग्रामविकास व पंचायतराज विभाग