गोविंदराव डावरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोविंदराव नारायणराव बल्लाळ (नारो बल्लाळ) डावरे ( १७ डिसेंबर १८३६ – मृत्यू: १३ डिसेंबर १८७९) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. स्वतःची सेना स्थापन करून त्यांनी इंग्रजी सत्तेशी लढा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

गोविंदराव डावरे यांचे चरित्र त्यांचे नातू विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी लिहिले आहे. या चरित्रात इसवी सनाच्या १७२५ सालापासून ते १८६५ पर्यंतच्या घटनांचे वर्णन केले आहे.