गोदावरी परिक्रमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोदावरी परिक्रमा म्हणजेच गोदावरी प्रदक्षिणा. दक्षिण भारतातील १,४६५ किलोमिटर लांबीची सर्वात मोठी गोदावरी नदी पवित्र व महापुण्यप्राप्तिकारक असल्याचा उल्लेख विविध पुराणांत अनेक ठिकाणी आहे. उगमापासून ते संगमापर्यंतची एकूण साडेतीन कोटी तीर्थं असल्याचे मानले जाते. [१] रामायण, महाभारत पर्वांत अनेक ऋषीमुनींनी गोदावरी तटांवर तपश्चर्या केल्याचा पुराणांत उल्लेख आहे. महर्षी व्यास यांनी गोदावरी परिक्रमा केल्याचे मानले जाते. त्यानंतर अनेक साधूसंतांनी गोदावरी परिक्रमा केली. आजही असंख्य भाविकभक्त पायीं, सायकल अथवा इतर वाहनाने सुप्रसिद्ध अशी 'गोदावरी-परिक्रमा' करताना सतत आढळतांत.

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://hindi.indiawaterportal.org/content/gaodaavarai-nadai/content-type-page/26337