गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संशोधन संस्था, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संशोधन संस्था, पुणे 
research and training institute of Economics in India.
माध्यमे अपभारण करा
प्रकार विद्यापीठ,
deemed university
स्थानपुणे, महाराष्ट्र, भारत
स्थापना
  • इ.स. १९३०
अधिकृत संकेतस्थळ
१८° ३१′ १२.९८″ N, ७३° ५०′ १३.२१″ E
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
গোখলে ইনস্টিটিউট অব পলিটিক্স অ্যান্ড ইকনমিক্স (bn); ಗೋಖಲೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಅಂಡ್ ಎಕನಾಮಿಕ್ಸ್ (kn); Gokhale Institute of Politics and Economics (en-gb); Gokhale Institute of Politics and Economics (en); Gokhale Institute of Politics and Economics (en-ca); गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संशोधन संस्था, पुणे (mr); गोखले राजनीति एवं अर्थशास्त्र संस्थान (hi) research and training institute of Economics in India. (en); ভারতের অর্থনীতি গবেষণা ও প্রশিক্ষণ প্রতিষ্ঠান (bn); ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); Universität in Indien (de); universitas di India (id); research and training institute of Economics in India. (en); भारत के सबसे पुराने अनुसंधान एवं प्रशिक्षण संस्थानों में से एक है। (hi); universiteit in Poona, India (nl) Gokhale Institute (en); গোখলে ইনস্টিটিউট (bn); गोखले संस्थान (hi)

इतिहास[संपादन]

१९०५ मध्ये  भारतीय नोकरदारांच्या शिक्षणास चालना देण्यासाठी व कार्यकारिणीसाठी भारतीय लोकांमध्ये क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली , गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संशोधन संस्था हे पुण्यातील एक अभिमत विद्यापीठ आहे. संशोधन व शिक्षांकार्यामुळे मे १९९३ पासून विद्यापीठ अनुदान आयोगाने संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. या संस्थेलाच गोखले इंस्टीट्यूट म्हणूनही ओळखले जाते. १९३० मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने स्थापित केलेली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे ही देशातील अर्थशास्त्रातील सर्वात जुनी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. भारतीय समाजातील सामाजिक-आर्थिक परिमाणांचे संशोधन करण्यासाठी ही संस्था समर्पित आहे.[१].या संस्थेने अनुभवजन्य आणि विश्लेषणात्मक संशोधनात मजबूत ओळखपत्रे स्थापित केली आहेत. अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण आणि संशोधनातील योगदानाबद्दल, 1993 मध्ये संस्थेला डीम्ड टू युनिव्हर्सिटी या संस्थेचा दर्जा देण्यात आला. ६ जून १९३० रोजी संस्था स्थापन करण्यात आली.

भारताच्या आर्थिक आणि राजकीय समस्यांबद्दल संशोधन करण्यासाठी संशोधकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली गेली. डी. आर. गाडगीळ हे संस्थेचे पहिले संचालक होते.

संशोधन[संपादन]

वर्षानुवर्षे विविध स्रोतांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीद्वारे संस्था पुढील प्रमुख क्षेत्रात संशोधन करत आहे -कृषी अर्थशास्त्र, लोकसंख्या अभ्यास आर्थिक इतिहास, नियोजन व विकासासाठी आदान-प्रदान विश्लेषण, अंशलक्षी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र, मौद्रिक अर्थशास्त्र, वित्तीय अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि पूर्व युरोपीय देशाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास.

प्रकाशने[संपादन]

गंथालय[संपादन]

गोखले अर्थशास्त्र संस्था ही स्थापनेपासून हिंद सेवक समाजाच्या ग्रंथालयाचा पूर्ण उपयोग करते. हे ग्रंथालय नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी १९०५ साली स्थापन केले. ग्रंथालयात २,५५,००० हून अधिक ग्रंथ आहेत, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४७२ नियतकालिके या ग्रंथालयात आहेत. व जवळ जवळ २००० नियतकालिकांचे जुने खंड ग्रंथालयात आहेत.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "History | GIPE". www.gipe.ac.in. 2019-01-06 रोजी पाहिले.