गोखरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सराट्याचे झाड

सराटा [१] किंवा काटे गोखरू[२] ( शास्त्रीय नाव: Tribulus terrestris ( ट्रिबुलस टेरेस्ट्रिस ), ( हिंदी: गोखरू ), ( संस्कृत: गोक्षुर ), इंग्रजी:land caltrops लेण्डकेलट्राप्स );)[३] प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पावसाळ्यातील सुरवातीच्या काळात उगवणारी ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. ही जमिनीवर सरपटत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या खोड व फांद्यांवर दाट लव असते. फांद्या जवपास ९० से.मी. लांबीच्या असतात. पाने लंबगोलाकार समोरील बाजूने किंचीत टोकदार, समोरासमोर ४ ते ७ जोड्यामध्ये असतात. टोकाजवळ किंचीत पांढर्‍या रंगाची असणारी पिवळी फुले पानांच्या बगलेत किंवा पानांसमोर हिवाळ्यात उगवतात. मुळे पांढर्‍या रंगाची मुलायम, रेशेदार, ऊसाच्या मुळासारखी असतात. [४]

चित्र दालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥. तुकाराम गाथा- अभंग संग्रह २८४९. (मराठी मजकूर)
  2. गोखरू. कुमार विश्वकोश. (मराठी मजकूर)
  3. लेण्डकेलट्राप्स. इंडीया९. (इंग्रजी मजकूर)
  4. गोखरू परिचय. जे.के.हेल्थवर्ड. (हिंदी मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]