गोकुळदास तेजपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेठ गोकुळदास तेजपाल (१८२२–-१८६७) हे मुंबई, भारतातील एक व्यापारी, समाजसुधारक आणि परोपकारी गृहस्थ होते.[१][२] त्यांच्या देणग्यांमधून मुंबईत गोकुळदास तेजपाल (जी.टी.)हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय स्थापन झाले. या महाविद्यालयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते.[३] त्यांच्या पैशातून गोकुळदास तेजपाल ॲंग्लो-व्हर्नाक्युलर हायस्कूल, गोकुळदास तेजपाल बोर्डिंग हाऊस, वगैरे उभे राहिले.[४][५]

जीवन[संपादन]

गोकुळदास यांचा जन्म १८२२ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी लहान वयातच बॉम्बेमध्ये फेरीवाला म्हणून जीवन सुरू केले होते. गोकुळदासांचे वडील तेजपाल यांचे १८३३ मध्ये निधन झाले.[२] काकादेखील मरण पावले तेव्हा त्यांची सर्व संपत्ती गोकुळदासांना मिळाली.

हे सुद्धा पहा[संपादन]

  • गोकुळदास तेजपाल रुग्णालय
  • करसनदास मुळजी
  • नर्मद
  • भाऊ दाजी

संदर्भ[संपादन]

  1. ^ Srivastava, Priyanka (2017-12-09). The Well-Being of the Labor Force in Colonial Bombay: Discourses and Practices. Springer. p. 230. ISBN 978-3-319-66164-3.
  2. ^ a b Buckland, C. E. (1999). Dictionary of Indian Biography. COSMO Publications. p. 417. ISBN 978-81-7020-897-6.
  3. ^ Kamath, M. V.; Kher, V. B. (1993). The Story of Militant But Non-Violent Trade Unionism: A Biographical and Historical Study. Navajivan Mudranalaya. p. 50. ISBN 978-81-7229-049-8.
  4. ^ David, M. D. (1995). Bombay, The City of Dreams: A History of The First City in India. Bombay: Himalaya Pub. House. p. 173. OCLC 35151683.
  5. ^ Directory of Educational Institutions (इंग्रजी भाषेत). R. P. Bookwala. pp. 236, 239, 248.