Jump to content

गेळफळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गेळफळ
टॅक्सॉन
वापरवनौषधी, लाकूड संपादन
लघुनामC. spinosa संपादन
वर्गाचे नावCatunaregam spinosa संपादन
वर्गिकरणातील प्रतवारीspecies संपादन
पालक वर्गCatunaregam संपादन
Has basionymGardenia spinosa संपादन
IUCN conservation statusमुबलक प्रजाती संपादन
External data available at URLhttps://www.gbif.org/dataset/93725bf2-6ada-47f9-bd5e-0e679e3d245e संपादन
Taxon rangeतिबेट स्वायत्त प्रदेश, क्वांगतोंग, म्यानमार संपादन
GRIN URLhttps://npgsweb.ars-grin.gov/gringlobal/taxonomydetail.aspx?id=103289 संपादन

गेळफळ किंवा मदनफळ हा लहानसर, झाळकट, टणक व पुष्कळ फांद्यांनी युक्त असा सुमारे १५ फूट उंचीचा वृक्ष आहे.

अन्य नावे

[संपादन]

एमेटिक नट (इंग्रजी), पतिरी (उरिया), मंगरी, गेळ (कन्नड), रास, किर्कालू (काश्मीरी), गेली (कोंकणी), मींढळ (गुजराती), पुंगारै (तामिळ), मरंग (तेलुगू), मेदेळ (नेपाळी), मिंडल (पंजाबी), मेनफल, मदन (बंगाली), मंगकायी (मल्याळम), Randia dumetorum-रेन्डिया ड्युमेटोरम किंवा Catunaregam spinosa (शास्त्रीय नाव), मदन (संस्कृत), मैनफल, मेणफल, करहल (हिंदी).

वर्णन

[संपादन]

ह्याच्या खोडावर बोटे-दोन बोटे लांबीचे लहान मोठे मजबूत काटे असतात. पाने गुळगुळीत, चकाकणारी, बोथट, गोल पण देठाकडे आकुंचित अशी असतात. या वृक्षाला एकेरी, देठरहित, पांढरी, सुगंधी फुले फांदीच्या टोकास येतात. पुष्पपात्र पाकळ्यांपेक्षा लहान; पाकळ्या लोमयुक्त. ह्या झाडाचे दिसणे व आकारमान हे ठिकाण, हवा, पाणी वगैरेंवर अवलंबून असल्यामुळे ती झाडे वेगवेगळी दिसतात. गेळाचे वृक्ष बहुतेक डोंगराळ प्रदेशात आढळतात. याचे फळ सुपारीएवढें असतें. पिकलेली फळे गोल व पिवळसर तांबूस रंगाची असतात. ती औषधात वापरतात. फळे योग्य वेळी काढून नीट रीतीने वाळवून ठेवावी लागतात. या फळाची भुकटी करून कोळी लोक नदींत टाकतात. त्यामुळे मासे लुब्ध होऊन पकडले जातात. फळे पिकल्यावर भाजून खातात. न भाजलेले गेळ पोटात गेल्यास ओकारी येते. त्यामुळे ते आयुर्वेदातल्या पंचकर्म विधीतील वमनासाठी वापरतात. पिकलेल्या फळाचा गळवावर लेप केल्यास गळू पिकते.