गेर्ड म्युलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गेर्ड म्युलर
गेर्ड म्युलर

गेर्ड म्युलर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावगेर्ड म्युलर
जन्मस्थळजर्मनी

गेर्ड अथवा गेरहार्ड म्युलर हा प्रसिद्ध जर्मन फुटबॉलपटू असून, त्याने जर्मनीसाठी सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला आहे. त्याचे समावेश जागतिक स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये होतो. त्याने जर्मनीसाठी ६२ सामन्यांमध्ये ६८ गोल केले आहेत जो राष्ट्रिय विक्रम आहे. तसेच बुंडेसलिगा मध्ये बायर्न-म्युनिककडुन खेळतान त्याने ४२७ सामन्यांमध्ये ३६५ गोल केले व ७४ युरोपीय सामन्यांमध्ये ६६ गोल केले. केवळ ब्राझिलचे पेले व रोमारिओ यांनी त्याच्यापेक्षा जास्ति गोल केलेले आहेत. त्याचा जर्मनीला १९७४ चा विश्वकरंडक जिंकुन देण्यात सिंहाचा वाटा आहे. त्याच्या कारकिर्दिची सर्वोत्कृष्ट कामगीरी १९७० च्या विश्वकरंडक स्पर्धेत होती ज्यात जर्मनीला ३ रे स्थान मिळाले. या स्पर्धेत म्युलर १० गोल केले होते. तसेच त्या वर्षी त्याने बायर्न म्युनिकला युरोपीयन करंडक जिंकुन दिला होता. या कामगीरी साठी १९७० चा 'फुटबॉलर ऑफ इयर' चा बहुमान मिळवला होता.