Jump to content

गुरुपुष्यामृत योग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरुपुष्य योग या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग (किंवा गुरुपुष्यामृत योग) असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषतः सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते. या दिवशी सोनारांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी खूप गर्दी होते[][][].

महाराष्ट्राबाहेर रवि-पुष्य योगाचे असेच महत्त्व असते. सन २०१८ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ९ ऑगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर.
सन २०१९ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट
सन २०२० चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर. सन २०२१ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर. यावरून असे दिसते की पहिले दोन किंवा तीन गुरुपुष्य योग लागोपाठ येतात आणि नंतरचा ७-८ महिन्यांनी येतो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Guru Pushya Yoga 2020 : शुभ संयोग के साथ एप्रिल की विदाई, मई से उम्मीद बाकी". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "गुरु-पुष्य नक्षत्र : सभी कार्य में सफलता दिलाएंगे यह 5 मंत्र..." hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.
  3. ^ Khan, Aabid. "27 मई हर तरह के कार्यों के लिए शुभ क्योंकि इस दिन गुरुपुष्य योग, 27 नक्षत्रों में यह आठवां और सर्वश्रेष्ठ". दैनिक भास्कर (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.