गिरीश जोशी
Appearance
(गिरीश जयंत जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
गिरीश जोशी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी नाटककार, नाट्यदिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता आहे. याने इ.स. १९८८पासून व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केली. याने लिहिलेली 'अभिनेत्री’', ’'फायनल ड्राफ्ट’ आणि, 'लव्ह बर्ड्स' ही नाटके विशेष गाजली. नाट्यलेखन व दिग्दर्शनाशिवाय याने मराठी चित्रपटांतून अभिनयही केला आहे. दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी ह्यांची पत्नी होती.
महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धेत गिरीश जोशींनी लिहिलेल्या बाभुळबन नाटकास पारितोषिक मिळाले होते.[ संदर्भ हवा ]. ही एकांकिका नंत ’अबोली’ या नावाने व्यावसायिक रंगभूमीवर सादर झाली. त्याचे निर्माते महेश मांजरेकर होते. त्यांनी या नाटकात कामही केले होते.
गिरीश जोशी यांनी लिहिलेली नाटके
[संपादन]- अबोली (’बाभुळबन’चे रंगभूंमीवरील नाव)
- अभिनेत्री
- काटकोन त्रिकोण
- फायनल ड्राफ्ट
- बाभुळबन (एकांकिका, १९९२ च्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पहिला क्रमांक)
- माकडाच्या हाती शॅंपेन (मूळ नाव - मारुतीच्या हाती शॅंपेन, आधी प्रायोगिक आणि नंतर व्यावसायिक झालेले नाटक)
- लव्ह बर्ड्स (हेही आधी प्रयोगिक रंगभूमीवर आले. प्रमुख भूमिका मुक्ता बर्वे)
पटकथा
[संपादन]- एक डाव धोबीपछाड
- काकस्पर्श
दूरचित्रवाणीसाठी लिहिलेल्या मालिका
[संपादन]- असंभव
- ‘आभाळमाया
- प्रारब्ध
- बंधन
- भूमिका
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |