गिरिजा दुधाट
Appearance
गिरिजा दुधाट या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे जन्मगाव अहमदनगर असून उच्चशिक्षण बडोदा आणि लंडन येथे झालेले आहे. लेखिका पेशाने पुरातत्वज्ज्ञ आहेत. मध्ययुगीन भारतीय शस्त्रे हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे. शस्त्रवेध - मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 'शिवशस्त्रशौर्यगाथा: श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा मराठा शस्त्रप्रदर्शन शस्त्रसूची' या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. भारतीय तलवारी, दांडपट्टा, रणगाडे या विषयांवर त्यांनी पोलंड, युक्रेन, लंडनयेथील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केलेले आहेत. लेखिका 'शस्त्र उवाच' या मध्ययुगीन भारतीय शस्त्रांचे विविध पैलू उलगडणाऱ्या ब्लॉगचे लेखन करतात.