Jump to content

गाड्सडेन खरेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गाड्सडेन खरेदी किंवा व्हेंता देला मेसिया (मेसियाची विक्री) हा अमेरिकेच्या ॲरिझोना आणि न्यू मेक्सिको राज्यांतील ७६,८०० किमी क्षेत्रफळाचा प्रदेश आहे. हा प्रदेश अमेरिकेने ३० डिसेंबर, इ.स. १८५३ रोजी मेक्सिकोकडून विकत घेतला. यावर त्यावेळच्या अमेरिकन राजदूत जेम्स गाड्सडेनने सही केली असल्यामुळे त्यास हे नाव देण्यात आले.