गवळी समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


महाराष्ट्रातील गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, वसई, रायगड, रत्नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.

सोमवंशी सम्राट यदू याच्यापासून चालत आलेला यादव जनसमूह भारताच्या अनेक भागात वास्तव्य करण्यास गेला. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले. पण त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय भात शेती हा आहे.

प्राचीन काळापासून हा समाज मुख्यत्वे शेती आणि पशुपालन करीत असे. हा यादवकालीन वारसा गवळी समाजाने सातत्याने चालू ठेवलेला आहे.

(इ.स. १२०० च्या जवळपासच्या कालखंडात महात्मा बसवेश्वरांच्या कालखंडात गवळी लोकांनी लिंगायत पंथ स्वीकारला. त्यानंतर लिंगायत गवळी ही जमात मूळ गवळी समुदायापासून वेगळी होऊन अस्तित्वात आली. त्यांना लिंगायत किंवा वीरशैव गवळी असे म्हणतात.

स्थान[संपादन]

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.

याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे, नाशिक,यवतमाळ, हिंगोली,परभणी, अमरावती इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.

इतिहास[संपादन]

मूळ हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्याची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते.

श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादव प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी ही घराणी मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेली. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादव राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली. काही यादव सौराष्ट्रातून निघून महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :-

ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली आहे. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे.

प्राचीन काळापासून गवळी, कुणबी, आगरी, कोळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. त्याकाळी कोकणचा प्रदेश हा शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला.

कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगऱ्याना देण्यात आला होता. मुंबई, वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. ​छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या काळात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजानीही त्यांना सहकार्य केले होते. आजही रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला  गवळी समाजाची अनेक गावे आहेत.

गवळी समाजाबद्दल[संपादन]

भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून ‘गवळी’ हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत.

जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे.

सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी आये" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.

समाजाची दैवते[संपादन]

गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय.

गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.

समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.

समाजाच्या रिती[संपादन]

गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो.

लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.

गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत या समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रामन असतो. गवळी समाजात आधीपासूनच स्त्रीपुरुष समानता आहे. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.

समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व कार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.

आगरी आणि कुणबी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच सोडवले जात; मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येते.

गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.

गवळी लोकांतील आडनावे व गावे[संपादन]

(आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड, चरई)

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हा:-

आवासकर, आईनकर, कोटकर, काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळ, गोपाळे, घाटवळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टोपरे, टावरे, ठसाळ, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तटकरी, तळकर, तिसकर, तांबडे, थळकर, दर्गे, दुर्गे, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, निगुडकर, पाटील, सरपाटील, पंदेरे, पंधारे, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेरले, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सरगे, साईकर, येसकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, शिळीमकर. 
 

देखनाळे,बुराण,बहिरट,बिडकर,कलागते,मिसाळ,डाकवे, देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर, पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे,आसोले katale, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर ,पुलाते ,भालेराव ,ढोकणे,अवसरे, फुके,काष्टे,भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे ई.

गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे[संपादन]

  • पुरुषांचीः- कान्हा, काळू, केरू, गोमा, गोंदया, गौऱ्या, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिवा, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू इ.

समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे जी किंवा राव लावत असत.

उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव.

  • बायकांचीं:- काळी, गुणा, गंगी, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिटी, पारबती, बाबी, बारकी, बाया, भागु, भिमा, चिमी, चांगी, रोंगी, विठी, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येसू इ.

लग्नानंतर मुलींचा नावापुढे बाई लावले जात असे.

उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई.

संदर्भ[संपादन]