गरज
Jump to navigation
Jump to search
thing that is necessary for an organism to live a healthy life | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
उपवर्ग | necessity | ||
---|---|---|---|
| |||
![]() |
समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. [१]
मानवी गरजा वाढण्याचे मुख्य दोन कारणे आहेत.
- नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा.
- लोकसंख्या मध्ये झालेली वाढ
गरजांची वैशिष्ट्ये[संपादन]
अमर्यादित गरजा[संपादन]
गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून,त्या कधीही न संपणाऱ्या असतात.एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात.
पुनरुद्भवी गरजा[संपादन]
काही गरजा पुन्हापुन्हा निर्माण होतात.तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात.
वयानुसार गरजा[संपादन]
वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते.
लिंगानुसार गरजा[संपादन]
स्त्री पुरुषांच्या गरजा अवशक्यता नुसार बदलतात.
पसंतीनुसार गरजा[संपादन]
प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी,आवडीनिवडी आणि पस पसंतीनुसार गरजांची निवड करतो.
हवामानानुसार गरजा[संपादन]
गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात.
संस्कृतीनुसार गरजा[संपादन]
गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात.गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. विशेषतः आहार,वेशभूषा इत्यादी.
गरजांचे वर्गीकरण[संपादन]
गरजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.
आर्थिक आणि अर्थिकेत्तर गरजा[संपादन]
- ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात.वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो.उदा. अन्न,औषध इत्यादी.
- ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय.उदा.हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.
वैयक्तिक गरजा आणि सामुहिक गरजा[संपादन]
- ज्या गरजा वेयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात.
- ^ गरजा