गड्डा-अभिवृद्धी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गड्डा-अभिवृद्धी (CORM PROPAGATION) गड्डा म्हणजे परिवर्तीत खोड व त्या परिवर्तीत खोडाभोवती शल्कासारखी दिसणारी पाने असतात. गड्डा हे परिवर्तीत खोड असल्यामुळे त्यावर पेरे असतात. या परिवर्तीत खोडात वनस्पतीचे अन्न साठवलेले असते. गड्डयाच्या वरच्या टोकाला खोडाचे टोक असते. व त्यापासून पाने आणि फुले यांचा उगम होतो. या गड्डयाला बगलअंकुर असतात. जुन्या गड्डयावर लहान लहान ग्ड्डे फुटतात ते वेगळे करून त्यांची लागवड करतात. छोटे ग्ड्डे 1-2 वर्षे जमिनीत वाढवून नंतर मोठे झाल्यावर त्यांना फुले येतात. जर ग्ड्डे मोठे असतील टीआर त्यांचे तुकडे करून त्या तुकड्यांचा अभिवृद्धीत वापर करतात. तुकडे केलेल्या ग्ड्ड्याना बुरशीनाशक पावडर मारावी. प्रत्येक तुकड्यावर अंकुर हवा. केळीची देखील लागवड अशी तुकडे करून करता येते.