गंजीचा मारुती
Appearance
पुणे शहरातील नाना पेठेत, भोर्डे आळीमध्ये मारुतीचे एक देऊळ आहे. या मारुतीला गंजीचा मारुती असे म्हणतात. पंढरपूरच्या यात्रेदरम्यान या मारुती मंदिरातर्फे वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. कबीर पोलीस चौकी किंवा क्वार्टर गेट यांच्या जवळच मारुतीचे हे देऊळ आहे. या देवळाच्या परिसरात ’हणमंत पेठ’ नावाची एक पेठ इ.स.१८१० च्या सुमारास वसविण्यात आली होती. ती पुढे नाना पेठेत विलीन झाली.