Jump to content

खेळियाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खेळियाड (इंग्लिश Kheliyad) हा मराठी भाषेतील क्रीडा विषयाला वाहिलेला लोकप्रिय ब्लॉग आहे. खेळियाड मराठी शब्द असून, तो ऑलिम्पियाड (Olympiad) या शब्दापासून तयार झाला आहे. खेळियाड हा एक ब्लॉग आहे. क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या आणि क्रीडा क्षेत्रातील संबंधित विविध विषयांवर भाष्य करणारा मराठी भाषेतला लोकप्रिय ब्लॉग आहे. क्रीडा पत्रकार महेश पठाडे यांनी ३ जुलै २०१६ रोजी या ब्लॉगची सुरुवात केली. सुरुवातीला महेश पठाडे डॉट ब्लॉगस्पॉट या नावाने या ब्लॉगची सुरुवात करण्यात आली. २०१९ मध्ये या ब्लॉगचे खेळियाड हे अधिकृत डोमेननेम खरेदी करण्यात आले.

८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर खेळियाड या नावाने एक प्रश्नमंजूषा कार्यक्रम असायचा. सुभाष अवस्थी आणि मिलिंद वागळे यांचे सादरीकरण या कार्यक्रमात असायचे. खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी दर्शकांना प्रश्न विचारला जायचा. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची ६०० धावांची विक्रमी भागीदारी अनेकांना माहीत असेलच. या भागीदारीनंतर त्यांना या कार्यक्रमात बोलावले होते. ब्लॉग सुरू करताना अनेक नावांचा विचार झाला होता. मात्र, विस्मरणात गेलेले खेळियाड हे नाव महेश पठाडे Archived 2020-06-16 at the Wayback Machine. यांनी निश्चित केले.

इतिहास

[संपादन]
क्रीडा पत्रकार महेश पठाडे यांनी 2016 मध्ये सुरू केला खेळियाड ब्लॉग

क्रीडा पत्रकारितेत 15 वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले महेश पठाडे यांनी  आशियाई क्रीडा स्पर्धांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांचे वृत्तांकन केले आहे. दैनिक सकाळ, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स आदी वृत्तपत्रांत त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. बातमीमागेही काही गोष्टी दडलेल्या असतात. त्या सर्वच वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतातच असे नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शब्दमर्यादा. त्यामुळे बरीचशी माहिती विस्तृतपणे मांडण्यासाठी स्वतःचं असं स्वतंत्र व्यासपीठ त्यांना हवं होतं. त्यासाठी ब्लॉग अर्थात अनुदिनी हे माध्यम त्यांनी निवडलं. सुरुवातीला वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेलं लेखन या ब्लॉगवरही वाचायला मिळू लागलं. नंतर त्यात नवनवीन माहिती समाविष्ट केली जाऊ लागली. मराठी भाषेत जगभरातील क्रीडा घडामोडींची माहिती फारशी उपलब्ध नाही. अनेक संदर्भ इंग्लिश भाषेतूनच वाचायला मिळतात. त्यामुळे खेळियाडच्या माध्यमातून मराठी भाषकांना हा माहितीचा खजिना उपलब्ध व्हावा या हेतूने या ब्लॉगची मुहूर्तमेढ ३ जुलै २०१६ रोजी रोवण्यात आली. २०१९ मध्ये क्रीडा विषयावरील लेखनप्रपंच आणखी विस्तारत त्याला व्यावसायिक स्वरूप दिले. त्यामुळे खेळियाड ब्लॉगला अल्पावधितच एक लाखापेक्षा अधिक वाचकांनी भेट दिली. नवनवीन लेखांची माहिती वाचकांना सहजपणे उपलब्ध होऊ लागली.


खेळियाड ब्लॉगमध्ये गोल्फ १गोल्फ २, सुमो, हॉकी, रॅम आदी खेळांचा इतिहास आहे. ओक्साना, दारासह अनेक खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. शंभरपेक्षा अधिक लेख या ब्लॉगवर समाविष्ट असून, मराठी भाषेत अशी माहिती देणारा हा एकमेव ब्लॉग आहे. याशिवाय महेश पठाडे यांचे जगजितसिंग यांच्या जीवनावर ‘मेरा गीत अमर कर दो’ हे ई बुकही प्रकाशित आहे. ई साहित्य प्रतिष्ठानने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

लेखसंग्रह

[संपादन]

Coronavirus : तोक्यो ऑलिम्पिक 2020 []

Coronavirus : 124 वर्षांत प्रथमच ऑलिम्पिक स्थगित []

Coronavirus : आयपीएल 2020 []

Coronavirus : थबकले अवघे क्रीडाविश्व []

सचिनसाठी किती कठीण होते शतकांचे महाशतक? []

क्रीडाहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे []

सुमो कुस्तीचा इतिहास []

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर []

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी []

मेरी कोमची प्रेमकहाणी [१०]

कंजूष गोलंदाज बापू नाडकर्णी [११]

या बारा क्रिकेटपटूंनी गमावले मैदानावरच प्राण [१२]

स्लेजिंगची गंमत [१३]

संकटांना पराभूत करणारा जिम्नॅस्ट [१४]

गुलाबी चेंडूचे रहस्य काय? [१५]

१९ वर्षांच्या मुलाची आई ऑलिम्पिकच्या मैदानात [१६]

चाळिशीनंतरही ऑलिम्पिक गाजविणारी जलतरणपटू [१७]

या महिला खेळाडू गर्भवती असतानाही उतरल्या मैदानात [१८]

सचिनची ४२ रहस्ये [१९]

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण? [२०]

का नाही हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ? [२१]

जगजितसिंग लेखमाला [२२]

माउंट एव्हरेस्टची थरारक लेखमाला [२३]

भारतात कोणी आणला चेस बॉक्सिंग? [२४]

इथं बायको खांद्यावर घेऊन पळतात [२५]

तुमच्या आयसीसीचा घो [२६]

या भारतीय महिलेमुळे जिंकले इराण [२७]

बुद्धिबळातला स्टीफन हॉकिंग [२८]

शायद कभी ख्वाबों में मिले [२९]

क्वीन ऑफ काटवे [३०]

सरांचं गणित चुकलं [३१]

सलाम विश्वविक्रमी सलामीला [३२]

गोल्फ म्हणजे काय रे भाऊ [३३]

नाशिकच्या यशवंत व्यायामशाळेच्या वेदना [३४]

एक होती फिंदर्डी [३५]

  1. ^ "Coronavirus : तोक्यो ऑलिम्पिक अखेर स्थगित". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-03-17. 2020-06-16 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Coronavirus : 124 वर्षांत प्रथमच ऑलिम्पिक स्थगित". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-03-25. 2020-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-16 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  3. ^ "Coronavirus : आयपीएल क्रिकेटलाही बाधा!". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-03-12. 2020-06-16 रोजी पाहिले.
  4. ^ "Coronavirus : थबकले अवघे क्रीडाविश्व". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-03-24. 2020-06-16 रोजी पाहिले.
  5. ^ Pathade, Mahesh. "शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?". Kheliyad. 2020-03-30 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  6. ^ Pathade, Mahesh. "क्रीडा हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे." Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  7. ^ "सुमो इतिहास". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-06-16 रोजी पाहिले.
  8. ^ Pathade, Mahesh. "महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा थक्क करणारा जीवनप्रवास". Kheliyad. 2020-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-10 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  9. ^ Pathade, Mahesh. "पुढचं लक्ष्य ऑलिम्पिक". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  10. ^ Pathade, Mahesh. "अशी आहे मेरी कोमची प्रेमकहाणी". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले.[permanent dead link]
  11. ^ Pathade, Mahesh. "हे कंजूष गोलंदाज कोण?". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले.[permanent dead link]
  12. ^ Pathade, Mahesh. "या १२ क्रिकेटपटूंनी मैदानावरच सोडले प्राण!". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  13. ^ Pathade, Mahesh. "स्लेजिंग.. एक बोलंदाजी!". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  14. ^ Pathade, Mahesh. "संकटांना पराभूत करणारा जिम्नॅस्ट". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  15. ^ Pathade, Mahesh. "गुलाबी चेंडूमागचे रहस्य काय?". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  16. ^ Pathade, Mahesh. "19 वर्षांच्या मुलाची आई तोक्यो ऑलिम्पिकच्या मैदानात!". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  17. ^ Pathade, Mahesh. "चाळिशीनंतरही ऑलिम्पिक गाजविणारी जलतरणपटू". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  18. ^ Pathade, Mahesh. "या महिला खेळाडू गर्भवती असतानाही मैदानात उतरल्या...!". Kheliyad. 2020-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-10 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  19. ^ Pathade, Mahesh. "सचिनची 42 रहस्ये, जी तुम्ही कधी वाचली नसतील..." Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  20. ^ Pathade, Mahesh. "सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण?". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  21. ^ Pathade, Mahesh. "हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही?". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  22. ^ "Kheliyad". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  23. ^ "You searched for mount everest". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-06-16 रोजी पाहिले.
  24. ^ Pathade, Mahesh. "Chess Boxing : भारतात कोणी आणला चेस बॉक्सिंग खेळ? part 2". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  25. ^ Pathade, Mahesh. "Wife Carrying competition : इथं बायको खांद्यावर घेऊन पळतात". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  26. ^ Pathade, Mahesh. "तुमच्या आयसीसीचा घो !". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  27. ^ Pathade, Mahesh. "स्त्रीशक्तीची सुवर्णपकड". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  28. ^ Pathade, Mahesh. "बुद्धिबळातला स्टीफन हॉकिंग". Kheliyad. 2020-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-10 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  29. ^ Pathade, Mahesh. "शायद कभी ख़्वाबों में मिलें..." Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  30. ^ Pathade, Mahesh. "क्वीन ऑफ काटवे". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  31. ^ Pathade, Mahesh. "सरांचं गणित चुकलं...!". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  32. ^ Pathade, Mahesh. "सलाम विश्वविक्रमी सलामीला". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  33. ^ "Kheliyad". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  34. ^ Pathade, Mahesh. "होय, मी 'यशवंत'च!". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)
  35. ^ Pathade, Mahesh. "एक होती फिंदर्डी...!". Kheliyad. 2020-03-10 रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)