खुर्लिताई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खुर्लिताई म्हणजे मंगोल टोळ्यांतर्फे बोलावली जाणारी सर्वसाधारण सभा. एकाधिकारशाहीवर चंगीझ खानाचा विश्वास नसल्याने तो आपले सल्लागार, मांडलिक टोळीप्रमुख व मुख्य सैन्याधिकारी यांना एकत्र बोलावून महत्त्वाच्या निर्णयांवर सभा घेत असे. इतर राज्यांवर स्वारी, स्वतःच्या राज्यातील महत्त्वाचे निर्णय ठरवणे किंवा कायदे करणे यासाठी खुर्लिताई बोलावली जाई.

खुर्लिताईला उपस्थित न राहण्याचा अर्थ इतरांनी घेतलेल्या निर्णयाला आपली संमती देणे असा होत असे. चंगीझच्या निर्णयाला नकार देण्याची गरज वाटत नसे तेव्हा बरेचजण खुर्लिताईला अनुपस्थित राहणे पसंत करत.

चंगीझच्या पश्चात त्याच्या बाकीच्या वंशजांनीही महत्त्वाचे निर्णय 'खुर्लिताई' बोलावून संमत करण्याची प्रथा कायम राखली.

हेसुद्धा पहा[संपादन]