खवल्या मांजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
खवल्या मांजर
Paleocene–Recent
Scaly ant eater by by Dushy Ranetunge 2a.jpg
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: फॉलिडोटा
(Pholidota)

कुळ: मॅनिडी
(Manidae)

जातकुळी: मॅनिस
(Manis)

Manis ranges.png

खवल्या मांजर (इंग्लिश: Pangolin, पँगोलिन) हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा आफ्रिका व आशिया इथल्या उष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळतो. ज्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते असा हा एकमेव सस्तन प्राणी आहे. हे खवले शृंगप्रथिन या पदार्थापासून बनलेले असतात (प्राण्याची नखे व गेंड्याचे शिंगसुद्धा शृंगप्रथिनांपासून बनते).

वर्णन[संपादन]

डोक्याचा वरच्या भाग, पाठ, शरीराचा बाजूचा भाग, संपूर्ण शेपटी व दोन्ही पायांच्या बाजूचा भाग, हे सर्व एकावर एक असलेल्या धारदार खवल्यांनी झाकलेले असतात. खवल्या मांजराच्या पोटावर विरळ व राठ केस असतात. खवल्यांमध्येसुद्धा थोडे केस असतात.[१].

स्वसंरक्षणासाठी खवले मांजर शरीराचे वेटोळे करून घेते. ते आपले खवले उंचावू शकते. असे केले की खवल्यांच्या धारदार कडा बाहेरच्या दिशेला रोखल्या जातात.[२].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडियन अ‍ॅनिमल्स [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  2. ^ बर्नी, डेव्हिड (२००३). द कन्साइज अ‍ॅनिमल एनसायक्लोपिडिया (इंग्रजी मजकूर). किंगफिशर. आय.एस.बी.एन. 0753408147. 


बाह्य दुवे[संपादन]

साचा:वाईल्ड लाइफ


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.