खल्वायन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खल्वायन ही शास्त्रीय संगीताला उत्तेजन देणारी रत्‍नागिरीतील एक संस्था आहे. तिची स्थापना १९९७ साली झाली. रत्‍नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेतर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी विनाशुल्क मासिक संगीत मैफल होते. गुढीपाडवा व दिवाळी पाडव्याला (सशुल्क) विशेष संगीत मैफली होतात. संस्थेने स्थापन झाल्यापासून २५२हून अधिक मासिक व ४०हून अधिक मोठ्या संगीत मैफली केल्या आहेत.. शिवाय संस्थेतर्फे दर वर्षी संगीत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते. संस्थेने २०१८ साली दिवाळी पाडव्यानिमित्त पं. जयराम पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कथामय नाट्यसंगीत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

खल्वायन संस्थेने पाच नवीन व सहा जुन्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करून राज्य नाट्य स्पर्धा व अनेक ठिकाणच्या संगीत नाट्य महोत्सवांत यश मिळवले आहे.