Jump to content

खंडोबा मंदिर (जेजुरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खंडोबा मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)
खंडोबाचं मंदिर

नाव: जेजुरीगड
देवता: खंडोबा
वास्तुकला: हेमाडपंथी
स्थान: जेजुरी, जिल्हा- पुणे, महाराष्ट्र
स्थान: जेजुरी, महाराष्ट्र
निर्देशांक: 18°16′20″N 74°09′37″E / 18.27222°N 74.16028°E / 18.27222; 74.16028


खंडोबा मंदिर हे जेजुरी येथे आहे. जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रपैकी एक आहे.या मंदिराला जेजुरी गड, खंडोबाची जेजुरी असे सुद्धा महणातात. []

दैवते

[संपादन]

खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहे. मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांची मूर्ती आहे तसेच खंडोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. येथे भाविक हळद- नारळ यांचा भांडार हवेत आणि देवावर उधळतात.[]

मंदिर

[संपादन]
जेजुरी मंदिर परिसर

या मदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना जवळ जवळ २०० पायऱ्याचढून जावं लागत, वाटेत बानाई, खंडोबांची द्वितीय पत्नी, हेगडी प्रधान यांचे मंदिर लागते. चंपाषष्ठी उत्सवाला भाविकांची येथे गर्दी असते.[]

इतिहास

[संपादन]

खंडोबाचे हे मंदिर पेशव्यांच्याकाळात बांधले गेले. मल्हारीमार्तंड, जे आणखी एक नाव खंडोबाचे आहे, यांचीपूजा १२-१३ व्या शतकापासून व्हायला लागली असे मानले जाते.[]

मंदिर परिसरात केले जाणारे धार्मिक विधी

खंडोबाला मल्हार मार्तंड, खंडेराया या नावाने सुद्धा संबोधले जाते. खंडोबाला प्रभू शिवा शंकराच अवतार मानले जाते. महाराष्ट्रातील धनगर, शेतकरी, इ. अनेक कुटुंबातील भाविक येथे खंडेरायाच्या दर्शनाला येतात.[][]

दंतकथा

[संपादन]

एकादांतकथे अनुसार दोन राक्षस भाऊ मनी आणी मल्ल यांनी भगवान ब्रहामाची तपस्याकेली व ब्रहामा खुश झाले, त्यांनी मनी- मल्लला वरदान दिले, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रासद्यायला लागले. मनी आणि मल्लाचा नाशकरण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला. मनी मल्लयांच्याशी भीषणयुद्ध केले त्यात एका भावाचा संहार केला व एकला जीवनदान दिले जेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्यजनांची सेवा करेल असे देवाला सांगितले. खंडेरायाने त्याला क्षमा केले. मल्ल राक्षसाला हरवले महणून खडोबाचेनाव मल्हारीपडले.[][]

मंदिर-स्थापत्य

[संपादन]
शिलालेख

हे मंदिर काळया दगडापासून बनलेले आहे.अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असे मंदिरातील भिंतीवर अंकित केलेल्या शिलालेखानुसार दिसून येते.

वाङ्मय

[संपादन]
  • 'जेजुरी', ही अरुण कोलाटकर यांनी लिहिलेली कविता या देवस्थानबद्दल आहे.
  • 'पेशवेकालीन जेजुरीचाइतिहास', राज मेमाणे यांनी लिहिलेले पुस्तक, यात जेजुरी पेशवे वेडेसची जेजुरीवरणलेली आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://www.lokmat.com/pune/every-day-20000-devotees-will-get-darshan-jejuri-fort-a727/. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Pattanaik, Devdutt (2020-06-15). Devi Devtaon Ke Rahasya: Bestseller Book by Devdutt Pattanaik: Devi Devtaon Ke Rahasya (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5048-789-1.
  3. ^ https://mumbaimirror.indiatimes.com/others/sunday-read/pilgrim-nation-jejuri-shower-of-turmeric/articleshow/56398652.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ https://www.dnaindia.com/mumbai/report-dna-special-centuries-old-temples-withered-by-vagaries-of-time-to-get-new-lease-of-life-2746402. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ https://web.archive.org/web/20220527195703/https://www.theweek.in/theweek/cover/2018/06/30/touch-of-turmeric.html. 2022-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-30 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/a-huge-crowd-of-devotees-to-visit-khandoba-at-jejuri-fort-terms-and-conditions-binding/videoshow/87572014.cms. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ https://www.timesnownews.com/spiritual/religion/article/champa-shashti-today-all-you-need-to-know-about-this-significant-day/696760. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ https://www.amarujala.com/bizarre-news/strange-story-of-khandoba-temple-in-maharashtra. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ https://www.hindustantimes.com/pune-news/know-the-temple-town-of-jejuri-during-the-reign-of-peshwas/story-BH3maCoazAUjoesCa4O1CO.html. Missing or empty |title= (सहाय्य)