Jump to content

खंडाळा (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खंडाळा (सातारा जिल्हा) या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?खंडाळा, पुणे जिल्हा

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
पंचायत समिती खंडाळा, पुणे जिल्हा


भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पश्चिम घाटात खंडाळा हे हिल स्टेशन आहे.[] पुणे जिल्यातील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणापासून साधारण ३ कि.मी.(१.९ मैल) आणि कर्जतपासून साधारण ७ कि.मी.(४.३ मैल) अंतरावर आहे.

ठिकाण

[संपादन]

कोंकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीतील बोर घाट जेथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. उत्तर बाजूस खोल दरी आणि दक्षिण बाजूस सह्याद्री पर्वताचा उंच पहाड याच्या मध्यभागी खंडाळा गाव वसलेले आहे. गावाच्या उत्तर बाजूने मुंबई-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग व भारतीय रेल्वे मार्ग जातो. खंडाळा स्टेशन हे कोंकण प्रांतातील कर्जत स्टेशननंतर थांबा असणारे स्थानक आहे. खंडाळा १८.४४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.२१ अंश पूर्व रेखांशावर वसलेले आहे.

मुंबई,पुणे व इतर जवळच्या शहरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येऊन पिकनिकचा आनंद लुटतात. ड्यूक्स नोज हे येथे एक जवळचे डोंगर शिखर आहे तेथून पर्यटकांना खंडाळ्याचा आणि बोर घाटाचा मनोवेधक नैसर्गिक सृष्टि सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो.

खंडाळा सनसेट पॉइंट

[संपादन]

खंडाळा सनसेट पॉइंटच्या जवळूनच गेले शंभर वर्षापासून समुद्र किनाऱ्यावरील शहरांना जोडणारा सोपारा ते पुणे मार्ग वापरात आहे. पूर्वीच्या काळी खोपोली या मूळ ठिकाणापासून खंडाळा पर्यंत माणसांनी आणि घोड्यांनी ओढले जाणारे खटारे वाहन म्हणून वापरले जात असत. त्यांच्या जाण्याच्या मार्गाचे साधारण १८४० चे आसपास ब्रिटिश राजवटीत डांबरीकरण झाले.

सन १८४९-१८६२ या कालावधीत ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचे मुख्य इंजिनिअर व रेल्वे मार्गाचे आराखडा करणारे आणि सर्वेक्षक (मोजणीदार) सर जेम्स जाॅन बर्कले यानी कर्जत ते पुणे हा रेल्वे मार्ग चालू केला. या मुख्य इंजिनियरचा ड्यूक्स नोज टेकडीला दर्शनीय असणारा एसटी. झेव्हिअर्स हा बंगला अध्याप खंडाळा येथे अस्तित्वात आहे. अतिशय कठीण अशा काळ्या कुट्ट दगडात भोके पाडून बोगदा काढणे म्हणजे अतिशय महत्प्रयासाचे काम होते. हे बोगदे आणि खंडाळा रेल्वे स्थानकचे बांधकामावेळी खंडाळा येथे पटकीची साथ होती. त्याही परिस्थितीत त्यांनी ते काम पूर्ण केले आणि याची काटेकोरपणे कागदोपत्री नोंद करून त्याला प्रशिद्दी देण्याचे कांमही सर जेम्स बर्कले यांनी चोख पार पाडले.

आणखी एक लक्ष वेधणारी बाब म्हणजे पर्यटकांना भेट ध्यावे वाटणारे असे ठिकाण म्हणजे पुरातन काराग्रह ! हे सन १८९६ मध्ये बांधण्यात आले होते. सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या संस्थापकांना युद्धकैदी म्हणून ब्रिटिशांनी या कारागृहात डांबले होते.

मनोरंजनाची ठिकाणे

[संपादन]

टायगर लीप/वाघदरी

[संपादन]

खंडाळ्यातील हे एक मनाला मोहिनी घालणारे ठिकाण आहे. या पॉइंटवरून काळजीपूर्वक तीक्ष्ण नजरेने तेथील दरीत पाहिले तर तेथे वाघ दरीत उडी मारतो आहे असा भास होतो..[]

अमृतांजन पॉइंट

[संपादन]

खंडाळा येथे आणखी एक उंच असा हा अमृतांजन पॉइंट आहे. तेथून रम्य आणि मनोरंजक अशा निसर्गाचे आणि कलात्मकतेचे विलोभनीय दर्शन घडते. अमृतांजन पॉइंटवरून प्रचंड असी मोठी खोल दरी तसेच ड्यूक्स नोज दिसते.

ड्यूक्स नोज

[संपादन]

ड्यूक्स नोज याला नागफणीही म्हणतात. ड्यूक ऑफ वेलिंग्टनचे नोज नागाच्या फण्यासारखे म्हणून त्यांच्या कार्यकाळानंतर या पॉंटला नागफणी म्हणून ही संबोधिले जाऊ लागले. ही जागा भटकंतीसाठी, दरी ओलांडण्यासाठी, पाषाणांवर लोंबकळण्यासाठी, दरीतून कड्यावर चढण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा कडा थेट २५०६ फूट उंच आहे. चढाईबहाद्दर हा कडा चढून जिंकण्यासाठी आतुर असतात. ज्या कोणाला हा कडा चढावयाचा असेल त्याने प्रथम या कड्याच्या दक्षिण बाजूस मुख्य ठिकाणी जाणे आवश्यक असते. तेथून ते किमान ३०० फूट चढाई करू शकतात. बेस स्टेशनला पोहचण्यासाठी खतरनाक असा १००० फूट प्रवास करावा लागतो. येथे ४ विभाग होतात. अतिशय स्पर्धात्मक चढाई म्हणजे ३रे आणि ४थे स्टेशन. हा कडा २५ फुटावरती ९० अंश कोनात लोंबकळल्यासारखा आहे. तेथे एखादाच फक्त हाताचे मदतीने लोंबकळू शकतो. त्याला पाय ठेवण्यासाठी तेथे आधार नाही. जातिवंत, कुशल, सराईत, पूर्वानुभवी, मार्गदर्शक असल्याशिवाय कडा चढण्याचा प्रयोग हाती घेऊ नये, असा तेथे अतिशय जाणीवपूर्वक आदेश दिला जातो

कार्ला आणि भाजा लेणी

[संपादन]

कार्ला आणि भाजा लेणी या पहाडात दगड तासून तयार केलेल्या ऐतिहाशिक गुंफा (कोरीव लेणी) आहेत. या खंडाळ्यापासून साधारण १६ कि.मी.अंतरावर आहेत. कार्ला गुंफा या पुरातन कालीन बौद्ध गुंफा आहेत.[] भाजा गुंफा ही कार्ला गुंफा सारख्याच आहेत पण त्या सर्वसाधारण आहेत. त्या चैत्यकालीन रचनेच्या आहेत.

भुशी लेक (Bhushi Dam)

[संपादन]

खंडाळा येथील भुशी लेक हे पर्यटकासाठी आणखी एक आदर्श ठिकाण आहे. पूर्व पश्चिम व उत्तर बाजूस उंच पहाड दक्षिणेस लांबच लांब भिंत आणि अथांग शांत असा पाणी साठा तसेच उंच पहाडावरील हिरवळ, फुले, उंच झाडे या बाबी डोळे दिपवून टाकतात. या लेकच्या सानिध्यात, तसेच स्वच्छ हवेत व आल्हाददायक वातावरणात आरामशीर वेळ घालविता येतो. येथील अथांग शांत पाणीसाठ्यात प्रतिबिंब पाहता येते आणि सभोवतालील रम्य वातावरणातील गुलाबी शांतता चाखता येते, असे हे शांत ठिकाण आहे.[]

द टॅब्लेट ऑन द वॉल ऑफ द जेल, खंडाळा ऑन वेस्टर्न घाट, टोम्बस्टोन ऑफ जेसुइट्स जर्मन प्रीस्ट, मंकी हिल, GIPR स्लीपर, द वन लेड बाय जेम्स बर्कले अँड हिज टिम ही ठिकाणे ही पाहता येतात.

प्रसिद्ध संस्कृती

[संपादन]

“आती क्या खंडाळा” या प्रसिद्ध गाण्यात संगीत लेखक आणि संगीत दिग्दर्शक नितीन राईकवर (राहणार वडगाव शेरी, पुणे) यांनी हिंदी सिनेमात खंडाळा शहराचे नाव घेऊन या शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. सन १९७५ मध्ये अशोक कुमार यांचा “छोटीसी बात” या सिनेमात खंडाळा येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त आर्मी अधिकाऱ्याने अमोल पालेकरासारख्या बुजऱ्या तरुण प्रेमींना प्रशिक्षण देण्याचा वर्ग काढला होता. . तोही सिनेमा अजरामर झाला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "खंडाळा". 2016-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ "वाघदरी ऑर टायगर्स लीप, खंडाळा".
  3. ^ "हिस्टरी बिहाइंड दि कार्ला केवज".
  4. ^ "भुशी डॅम".