क्लॅव्हिकॉर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

क्लॅव्हिकॉर्ड एक पाश्चिमात्य तंतुवाद्य आहे. स्वरपट्टी असलेले हे वाद्य पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत प्रचलित होते.

लहान लांबट चौकोनी पियानोसारख्या दिसणाऱ्या या वाद्यात प्रत्येक स्वरासाठी, एक वा दोन तारांवर आघात करणाऱ्या छोट्या हातोड्या असतात. कोणत्याही स्वराची पट्टी दाबली, की हातोडी आणि त्याबरोबर तारही उचलली जाते. स्वराची पट्टी जितकी जोरात दाबावी, तितक्या प्रमाणात तारेवरील ताणही वाढत असल्याने स्वराची तीव्रता, जाणवेल अशा तऱ्हेने, कमीजास्त करता येते. कुशल बोटफिरत करून स्वरात अधरपणा (tremolo) न आणता कंप (vibrato) आणू शकतो. तार आणि हातोडी यांतले यांतले अंतर कमी असल्याने मृदू आवाज निर्माण करणारे हे वाद्या मोनोकॉर्डपासून विकसित केल्याचे समजले जाते.