क्रागुयेवाशची कत्तल
Appearance
क्रागुयेवाशची कत्तल ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू, रोमानी आणि सर्बियन पुरुष व मुलांची जर्मन सैन्याने केलेली कत्तल होती. ऑक्टोबर २० आणि २१, इ.स. १९४१ या दोन दिवसात क्रागुयेवाश शहर आणि आसपासच्या भागातून जर्मन सैन्याने सोळा आणि साठ वर्षांदरम्यानच्या वयाचे व्यक्ती गोळा केले. यात जर्मन सैन्याला सर्बियातील जर्मनीशी मिळवणूक करणाऱ्या सर्बियन लोकांचीही साथ होती.[१][२] यातून वरील गटांतील लोकांना वेगळे करून त्यांना ठार मारण्यात आले. २९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार २,३०० लोक यात मारले गेले.[३] युद्धोपरांत अहवालांत हा आकडा ५,००० आणि ७,००० च्या मध्ये होता.[४] संशोधनांती जर्मन संशोधकांनी २,७७८ हा आकडा मान्य केला आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b Stevan K. Pavlowitch (2008). Hitler's new disorder: the Second World War in Yugoslavia. p. 62. ISBN 0-231-70050-4.
- ^ Lampe (2000), pp. 215–217
- ^ Kurapovna, Marcia Christoff (2009). Shadows on the Mountain: The Allies, the Resistance, and the Rivalries That Doomed WWII Yugoslavia. John Wiley & Sons. p. 167; ISBN 0-470-08456-1.
- ^ Tomasevich, Jozo; Vucinich, Wayne S. (1969). Contemporary Yugoslavia: Twenty Years of Socialist Experiment. p. 370.