कोरफड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोरफड
कोरफड

कोरफड ही आफ्रिका, अरबी द्वीपकल्प, दक्षिण आशिया येथे उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.

टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते.

कोरफडीस संस्कृतमध्येये कुमारी, इंग्रजीत बार्बेडोस ॲलो [१] व शास्त्रीय परिभाषेत ॲलो बार्बेडेन्सिस [२] असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुळातील असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. हिच्या भारतीय जाती Aloe vera (ॲलोव्हेरा) आणि Aloe indica (ॲलोइंडिका) या आहेत.

उपयोग[संपादन]

कोरफडीमध्ये अँलोइन (२० ते २२%), बार्बॉलाइन (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाइम व इतर औषधी रसायने असतात. कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टिकर, बलदाती अशा विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीच्या रसात जीवाणू प्रतिकारक शक्ती असते. हिच्या पानांत ॲलोइन व बार्बालाइन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात.Copyright-problem paste.svg
या विभाग http://marathi.webdunia.com/miscellaneous/beauty/tips/1201/17/1120117015_1.htm येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.खेड्यापाड्यात जमिनीवर किंवा घराच्या छतावर लटकणारे कोरफडीचे रोप हल्ली सौंदर्यप्रसाधनांत व औषधांमध्ये प्रामुख्याने वापरले जाते. कोरफडीच्या पानांमध्ये आर्द्रता साठवण्याची क्षमता असते. याचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचेत चमक येते. त्वचा भाजली गेली असेल तरी कोरफडीचा रस लावल्याने फायदा होतो.

कोरफडीचे फायदे 

कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्टापासून आराम मिळतो.
गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.
कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.
कोरफडीचा शरीरारतील उष्मा कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले