Jump to content

कोबाड गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोबाड गांधी हे नक्षलवादी चळवळीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा जन्म पारशी कुटुंबात झाला. देहरादून येथील शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर लंडन येथेन चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ इंग्लंडमधील विविध कंपन्यांमध्येही काम केले.[][]

कोबाड गांधी हे कानू सन्याल यांच्यानंतर नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी देणारे व आपले आयुष्य नक्षलवाद्यांसाठी समर्पित केलेले नेते आहेत. ते माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही आहेत.

देशात नक्षलवादी जाळे पसरविण्याच्या आरोपाखाली कोबाड गांधी यांना दिल्ली पोलिसांनी २००९ साली अटक केली.[]

संदर्भ

[संपादन]