कॉलोराडो प्रांत
Appearance
कॉलोराडो प्रांत अमेरिकेतील एक प्रदेश होता. हा प्रांत २८ फेब्रुवारी, १८६१ ते १ ऑगस्ट, १८७६ दरम्यान अस्तित्त्वात होता. या दिवशी या प्रांताला अमेरिकेचे राज्य करून घेण्यात आले.
१८५९-६१मध्ये पाइक्स पीकच्या आसपासच्या प्रदेशात सोने सापडल्यावर येथे मोठ्या प्रमाणात श्वेतवर्णीय व्यक्ती आल्या. त्यानंतर या प्रदेशाला प्रांताचा दर्जा देण्यात आला. या प्रदेशाच्या चतुःसीमा सध्याच्या कॉलोराडो राज्याच्या सीमा याच होत्या. या प्रांताच्या रचनेद्वारे या सुमारास सुरू असलेल्या अमेरिकन यादवी युद्धात या प्रांताद्वारे उत्तरेला खनिजे, विशेषतः सोने, चांदी व इतर मौल्यवान खनिजांचा साठा हस्तगत झाला.