Jump to content

कॉर्निंग काचवस्तू संग्रहालय

Coordinates: 42°08′59″N 77°03′15″W / 42.149813°N 77.054297°W / 42.149813; -77.054297
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
६०० ग्लासच्या भांड्यांनी नावलेला ही उंच रचना

कॉर्निंग काचवस्तू संग्रहालय हे ३,५०० वर्षांपूर्वीचा इतिहास आणि ४५,००० पेक्षा जास्त काचेच्या वस्तू एका ठिकाणी पाहायचे एकमेव ठिकाण आहे.

काचेचे संग्रहालय

[संपादन]

१९५० साली सुरू झालेल्या या वस्तू संग्रहालयात सुरुवातीला फक्त २००० काचेच्या वस्तू होत्या. हे वस्तू संग्रहालय कॉर्निंग फाक्टोरीच्या मालकीचे असले तरी त्यांच्या मालाची जाहिरात करायचे ठिकाण नाही. कॉर्निंग काचवस्तू संग्रहालय हे आता एक स्वतंत्र "ना नफाना तोटा" या तत्त्वावर चालणारी एक संस्था आहे. हा केवळ काचेच्या प्लेट बनवायची कारखाना नसून एक मोठी कार्यशाळाच आहे. आपल्याला काचेच्या वस्तू म्हणजे कप, बशी, झुंबर, तावदाने, पेपर वेट फार तर फार प्लेट्स, रसायन शास्त्रातील उपकरणे या पुढे आपली गाडी जात नाही. काचेच्या वस्तूंचे 'वस्तू संग्रहालय' असू शकते यावरच काही आपला विश्वास बसत नाही. पण तेथील एकेक विभाग पाहिले की थक्क होते. २-२ इंचाच्या पेपरवेट पासून १५-२० फुटाच्या काचेच्या दरवाज्यांचा संग्रह इथे आहे. मग, बाउल, प्लेट्स, खिडक्या, दरवाजे, प्रदर्शनीय वस्तू अशा अनंत गोष्टी तेथे आहेत. जगाचा काचेचा इतिहास, त्यातील कला, कलेचे बदललेले विचार आणि संदर्भ हे सारे अतिशय विस्ताराने तेथे विषद करण्यात आलेले आहे. येथील वाचनालय ही जगातील काचेच्या संदर्भात माहिती देणारे वाचनालय येथे असून तेथे जगातील ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये काचेची जगात असेल नसेल ती माहिती मिळते. ३ लाखापेक्षा जास्त संदर्भ आणि १२ व्या शतकापासूनची माहिती असे याचे स्वरूप आहे.

इतिहास

[संपादन]
हॉट ग्लास शो मध्ये काचेच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक

१९७२ साली या परिसरात खूप प्रमाणात पाऊस झाला आणि हे सारे वस्तू संग्रहालय पाण्याखाली गेले होते. सगळ्या काचेच्या वस्तू चिखलात जमा होऊन खराब झाल्या. सगळी पुस्तके आणि संदर्भ पाण्यावर अनेक दिवस तरंगत होते. साधारण ४०% मालमत्तेचे आणि वस्तूंचे नुकसान यात झाले. आता पर्यंतच्या जगातील इतिहासातील सर्वात मोठे नुकसान झालेले वस्तू संग्रहालय असे याचे वर्णन करत येईल. आता या साऱ्या वस्तू आणि माहिती होती तशी बनवायला काय प्रयास पडले असतील? वस्तू संग्रहालयाच्या कर्मचारी वर्गाने दिवस-रात्र एक करून एक एक काचेची वस्तू चिखलातून शोधून स्वस्छ करून होती तशी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पुस्तके आणि संदर्भाचे एकेक पान उन्हात वाळवून त्याची परत डागडुजी करण्यात आली. वस्तू संग्रहालयाला मिळालेल्या वाढीव जागेसह परत एकदा वस्तू संग्रहालय १९८० साली उभे राहिले ते नव्या उत्साहाने आणि अजून मोठा काचेचा संग्रह घेऊन. आज वर्षाला ३ लाखापेक्षा जास्त पर्यटक या वस्तू संग्रहालयाला भेट देतात. त्यांना आवडेल असे एक काचेचे Shopping Market हा तर प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो.

हॉट ग्लास शो

[संपादन]

कॉर्निंग मुझीयम ऑफ ग्लास मधील सगळ्यात प्रेक्षणीय प्रकार म्हणजे तेथील 'हॉट ग्लास शो'. दर दोन तासांनी हा शो करतात आणि त्यात काचेची वस्तू आपल्यासमोर करू दाखवतात. एक जण काचेची वस्तू करतो तर दुसरा त्याला मदत करतो आणि निवेदन करतो. आपल्या नजरेसमोर एखादी काचेची सुंदर वस्तू होताना पाहण्याचा अनुभव फारच मस्त आहे. काचेचे विविध उपयोग सांगण्यासाठी इथे एक वेगळा विभाग केला आहे. दुर्बीण बनवण्यापासून आरश्या पर्यंत अनेक गोष्टी तेथे ठेवण्यात आल्या आहेत. कमीत कमी एक दिवस पूर्ण काढला तर हे वस्तू संग्रहालय पूर्ण पाहून होऊ शकते.

संदर्भ

[संपादन]

बाह्यु दुवे

[संपादन]

विकिमिडिया कॉमन्सवर Corning Museum of Glass शी संबंधित संचिका आहेत.

42°08′59″N 77°03′15″W / 42.149813°N 77.054297°W / 42.149813; -77.054297