Jump to content

कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संगणक नेटवर्क टोपोलॉजी (कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी)[संपादन]

 • नेटवर्क टोपोलॉजी हे नेटवर्कच्या व्यवस्थेचे वर्णन आहे, जोडणीच्या ओळींतून विविध नोड्स (प्रेषक आणि प्राप्तकर्ता) जोडणे.
 • नेटवर्क टोपॉलॉजी ही एक कॉम्प्युटर नेटवर्कमधील विविध घटकांची (लिंक, नोड, इत्यादी) रचना आहे.

संगणक नेटवर्क टोपोलॉजीचे (नेटवर्क टोपॉलॉजीचे) खालील मूलभूत प्रकार आहेत:

कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी

1) पॉइंट-टू-पॉईंट (Point-to-point):[संपादन]

 • पॉइंट-टू-पॉईंट (PTP) टोपॉलॉजी एकच केबलचा वापर करून थेट दोन नोड्ज कनेक्ट करते.
 • मोडेमद्वारा दोन कॉम्प्युटरमधील कम्युनिकेशन हे पॉइंट-टू-पॉईंट टोपॉलॉजीचे उत्तम उदाहरण आहे.

2) बस टोपॉलॉजी (Bus Topology):[संपादन]

Bus Topology

बस टोपॉलॉजी हे लहान ऑर्गनायझेशनद्वारा वापरले जाणारे सर्वात स्वस्त नेटवर्क आहे. बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा थेट केबलने जोडलेला असतो.

फायदे (Advantages)-

 • बस टोपॉलॉजी कमी खर्चिक आहे.
 • याचा वापर आणि ही समजून घेणे सोपे आहे.
 • यात एक कॉम्प्युटर किंवा तत्सम डिव्हाईस कनेक्ट करणे सोपे असते.
 • या नेटवर्कचा विस्तार करणे सोपे आहे.

तोटे (Disadvantages)-

 • खूप जास्त मोठे नेटवर्क असेल तर बस टोपॉलॉजी खूप स्लो होते.
 • मुख्य केबल ब्रेक झाली तर संपूर्ण नेटवर्क बंद होते.

3) स्टार नेटवर्क (Star Topology):[संपादन]

Star Topology
 • स्टार नेटवर्कमध्ये सर्व नोड्ज हे एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात आणि हे उपकरण एखादा होस्ट, हब, राऊटर किंवा स्विच असू शकते.
 • हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते तर इतर नोड्ज हे क्लायंटचे काम करतात.
 • यातील सर्व संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो.

स्टार नेटवर्कमध्ये उपकरणे बहुधा अनशील्ड ट्विस्टेड पेअर्ड (UTP) केबलने जोडलेली असतात.

फायदे (Advantages)- • बस नेटवर्कच्या विपरीत, स्टार नेटवर्कमध्ये एखादा नोड किंवा केबल अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर परिणाम होत नाही. • नेटवर्कमध्ये दुसरे वर्क स्टेशन जोडणे सोपे आहे. • केंद्रीय नेटवर्किंग उपकरणाचा वापर केल्याने खर्च कमी होतो.

तोटे (Disadvantages)- • केंद्रीय उपकरण अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर त्याचा परिणाम होतो.


4) रिंग बस टोपॉलॉजी (Ring Topology):[संपादन]

Ring Topology
 • रिंग बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोड्जना जोडलेला असतो आणि अशा प्रकारे एक सर्क्युलर नेटवर्क तयार होते.
 • यातील नोड हा, जोपर्यंत पॅकेट त्याच्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत त्याला एकाच दिशेने पाठवितो.

फायदे (Advantages)- • सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो. हा क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकतो, पण असे झाल्यास याचा वेग मंदावतो.

तोटे (Disadvantages)-

 • यातील कोणत्याही नोडचे अपयश हे संपूर्ण नेटवर्क प्रभावित करते.
 • एखादा नोड काढण्यासाठी किंवा जोडण्यासाठी संपूर्ण नेटवर्क बंद करावे लागते.

5) मॅश पॅकेट (Mesh Topology):[संपादन]

Mesh Tolology
 • मॅश टोपोलॉजी ही अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करते, की जीत प्रत्येक नोड (ज्यांना मॅश नोड म्हणतात) हा नेटवर्कमध्ये डाटा ईले करतो.
 • या प्रकारात होस्ट हा दुसऱ्या एका किंवा अनेक होस्टना जोडलेला असू शकतो.
 • या टोपॉलॉजीतले सर्व नोड्ज नेटवर्कमध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात.

फायदे (Advantages)- मेश टोपॉलॉजीच मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल जरी ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने केला जाऊ शकतो..

तोटे (Disadvantages)-

 • यात अनेक पाथवेंचा वापर असल्याने याला अतिरिक्त केबलिंग आणि नेटवर्क इंटरफेसची आवश्यकता भासते.
 • हा मॅनेज करणे फार कठीण आहे.

6) ट्री पॅकेट (Tree Topology):[संपादन]

यालाच हायरार्किकल असे म्हणतात.


 • ट्री टोपॉलॉजी मूलतः बस टोपॉलॉजी आणि स्टार टोपॉलॉजी यांचे संयोजन आहे.
 • ही टोपॉलॉजी नेटवर्कला अनेक लेव्हल्स/लेयर्समध्ये विभाजित करते.
 • यात रूट नोड, इंटमीजिएट नोड आणि अल्टिमेट नोड यांचा समावेश असतो.
 • ही संरचना हायरार्किकल प्रकारात असते आणि आणि कोणत्याही इंटरमीजीएट नोडला कितीही नोड्ज कनेक्ट असू शकतात.
 • या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल टीव्ही तंत्रज्ञान.
 • इतर उदाहरणे म्हणजे डायनामिक ट्री वर आधारित लष्करी, खाणकाम आणि अन्य मोबाईल ॲप्लिकेशन्स..

फायदे (Advantages)-

 • यातील सेकंडरी नोड्ज हे सेंट्रल नोडला अधिक उपकरणे जोडण्याची परवानगी देतो.
 • उपकरणांशी पॉईंट टू पॉईंट कनेक्शन.
 • नेटवर्कचे विविध स्तर मॅनेज करायला सोपे आहेत, आणि म्हणून दोष ओळखणे अधिक सोपे होते.

तोटे (Disadvantages)-

 • जेव्हा नेटवर्क खूप मोठे असते, तेव्हा नेटवर्कचा मेंटेनन्स एक समस्या होऊ शकते.
 • ट्री टोपॉलॉजी ही अनेक बस टोपॉलॉजी मिळून बनते, त्यामुळे जेव्हा याचा आधारस्तंभ बाधित होतो, तेव्हा पूर्ण नेटवर्क बाधित होते.

7) हायब्रिड टोपॉलॉजी (Hybrid Topology):[संपादन]

 • हायब्रिड टोपॉलॉजी हे दोन किंवा अधिक बेसिक टोपॉलॉजीचे इंटरकनेक्शन आहे, ज्यातील प्रत्येकजण नेटवर्कमध्ये भाग घेतो, परिणामी ही कोणतीही मानक टोपॉलॉजी प्रदर्शित करीत नाही.
 • इंटरनेट हे हायब्रिड टोपॉलॉजीचे सर्वात उत्तम उदाहरण आहे.

फायदे (Advantages)-

 • शोधताना चुका शोधणे आणि समस्या निवारण करणे सोपे आहे.
 • प्रभावी आहे.
 • आकार म्हणून स्केलेबल सहज वाढवता येऊ शकते.
 • लवचिकता आहे.

तोटे (Disadvantages)-

 • मोठे नेटवर्क बनविताना फार गुंतागुंतीचा होतो.
 • हा नेटवर्क बनविताना फार महाग पडतो.