Jump to content

के. राधाकृष्णन (राजकारणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
K. Radhakrishnan

केरळ विधान सभा मध्ये अध्यक्ष

राजकीय पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

के. राधाक्रुष्णन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे थ्रिसुर येथील नेते आहेत, व केरळ विधान सभेचा चेलाकारा ह्या मतदारसंघातुन पूर्व सदस्य आहे. ते ई. के. नायनारच्या तिसऱ्या सरकारमध्ये युवा प्रकरण व एस.सी, एस.टी. प्रकरण मंत्री १९९६ - २०११ ह्या दरम्यान होते. ते केरळ विधान सभेचा २००६ - २०११ पर्यंत अध्यक्ष होते. ते अतिशय गरीब घराण्यातुन येवुन राजकारणात सक्रीय झाले, व मंत्री पदापर्यंत अतिशय कमी काळात पोहोचले.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

त्यांचा जन्म २४ मे १९६४ला ईडुक्की येथे झाला. त्यांचे पालक एम.सी. कोचुंनी व चिनंमा आहेत. त्यांचे वडील थ्रिसुर जिल्ह्यातील चेलक्करा ह्या गावचे. ते एक वृक्षारोपण कामगार होते. त्यांचे प्राथमिक शिक्शण थोनुरकरा यु.पी. शाळा येथे झाले. त्यांचे मध्यवर्ती शिक्शण चेलकरा येथे झाले. त्यांनी पुढील शिक्शण थ्रिसुर येथुन घेतले, व बि.ए. करताना त्यांनी राजकारणात पाऊल टाकले.

राजकीय जीवन[संपादन]

ते एस.एफ.आय.चा सक्रीय कार्यकर्ता होते. त्यांनी केरळ वर्मा विद्यालयाचा सचिव, चेलाकरा विभाग अध्यक्ष, थ्रिसुर जिल्हा सचिवालय अशी अनेख पदे सांभाळली. त्यांनी चेलाकरा ब्लाॅक समितीचे सचिव, डी.वाय.एफ.आय.चे राज्य समिती सदस्य, व माकपचे राज्य समिती सदस्य म्हणुन कार्य केले. १९९१ साली ते थ्रिसुरच्या जिल्हा समिती मध्ये वलाथ्थोल नगर येथुन निवडुन आले. ते १९९६, २००१ व २००६ मध्ये विधान सभेत निवडुन आले. १९९६ - २००१ पर्यंत ते मागासवर्ग व युवा प्रकरण मंत्री होते. २००१ - २००६ मध्ये तो विरोधी पक्षनेता होते.

सरकारच्या शिक्षण धोरणांविरुद्ध विद्यार्थी आंदोलनांचे नेत्रुत्व करतांना त्यांना अटक करण्यात आली व पोलिसांकडुन त्रास देण्यात आला. राधाक्रुश्णन यांनी स्वतःला शेती कामगारांच्या अडचणींमध्ये सामिल केले व त्यांना संघटीत केले. त्याने केरळ सस्त्र साहित्य परिषदे ब संपूर्ण साक्शारता अभियानात भाग घेतला.

के. राधाक्रुश्णन १८ व्या विधान सभेचा अध्यक्ष होते. ते काँग्रेसच्या विरोधी एम. मुरलीच्या ४० विरुद्ध ९३ मतांने निवडुन आले. त्यांनी अध्यक्ष म्हणुन त्याचा काळ पूर्ण केला, व असे करणारे ते एम. विजयाकुमार, जो त्याचा अध्यक्षत्वाच्या काळात क्रीडा मंत्री होते, नंतर दुसराच अध्यक्ष होते. नंतर ते ५ वर्ष पुन्हा आमदार होता. त्यानंतर यु. आर. प्रदीप ने त्याचे स्थान ग्रहण केले.

मतदानात प्रदर्शन[संपादन]

वर्ष मतदारसंघ विजेता पक्श व गट पराभूत सदस्य पक्श व गट
२०११ चेलेकरा के. राधाक्रुश्णन माकप, लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट के. बी. ससीकुमार काँग्रेस, युनाटेड डेमोक्रॅटीक फ्रंट
२००६ चेलेकरा के. राधाक्रुश्णन माकप, लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट पी.सी.मनीकंदन काँग्रेस, युनाटेड डेमोक्रॅटीक फ्रंट
२००१ चेलेकरा के. राधाक्रुश्णन माकप, लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट के.ए.तुलासी काँग्रेस, युनाटेड डेमोक्रॅटीक फ्रंट
१९९६ चेलेकरा के. राधाक्रुश्णन माकप, लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट टि.ए.राधाक्रुश्णन काँग्रेस, युनाटेड डेमोक्रॅटीक फ्रंट

वादंगे[संपादन]

के. राधाक्रुश्णन ने माकपच्या वतीने ५ नोवेंबर २०१६ला पी.एन. जयंथनचे बलात्काराच्या आरोपामुळे सदस्यत्व रद्ध केल्याबद्दल पत्रकारांना सांगीतले. त्याने हे सांगताना बलात्काराच्या बळीचे नाव सुद्धा सांगीतले. पत्रकारांने ईशाराकेल्यावर सुद्धा, जर जयंथनचे नाव देऊ शकतो तर बळीचे देने का चुकीचे, हे त्याने सांगीतले. ह्यामुळे त्यावर खुप टिका झाल्या, कारण भारतीय दंड संहितेच्या २२८ ए ह्या भागानुसार, बलात्कारातील बळीचे नाव ऊघड्यास आणण्यावर सक्त मनाई आहे. 

संदर्भ[संपादन]