Jump to content

कॅले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅले
Calais
फ्रान्समधील शहर


ध्वज
चिन्ह
कॅले is located in फ्रान्स
कॅले
कॅले
कॅलेचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 50°56′53″N 1°51′23″E / 50.94806°N 1.85639°E / 50.94806; 1.85639

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑत-दा-फ्रान्स
विभाग पा-द-कॅले
क्षेत्रफळ ३३.५ चौ. किमी (१२.९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१८)
  - शहर ७२,९२९
  - घनता २,२०० /चौ. किमी (५,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.mairie-calais.fr


कॅले (फ्रेंच: Calais) हे फ्रान्स देशाच्या उत्तर भागामधील एक लहान शहर व प्रमुख बंदर आहे. कॅले इंग्लिश खाडीच्या डोव्हरच्या सामुद्रधुनीवर वसले असून येथून इंग्लंडमधील डोव्हर हे गाव केवळ ३४ किमी (२१ मैल) दूर आहे. १९९४ सालापूर्वी इंग्लंड व फ्रान्सला जोडणाऱ्या चॅनल टनेलच्या आधी कॅले हे ह्या दोन देशांमधील सागरी वाहतूकीचे केंद्र होते.

कॅलेच्या स्थानामुळे मध्य युग काळापासून ह्या शहराच्या अधिपत्यासाठी संघर्ष होत राहिला आहे. इ.स. १३४७ साली इंग्लंडचा राजा तिसऱ्या एडवर्डने कॅलेवर विजय मिळवला व पुढील २०० वर्षे कॅले इंग्लंडच्या अधिपत्याखाली राहिले. इ.स. १५५८ साली दुसऱ्या हेन्रीने कॅलेवर आक्रमण करून हे शहर पुन्हा फ्रेंचांकडे खेचून आणले. मे १९४० मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने कॅलेवर बाँबहल्ला करून हे शहर संपूर्णपणे जमीनदोस्त केले होते.

आजच्या घडीला कॅले उत्तर फ्रान्समधील एक प्रमुख वाणिज्य व वाहतूक केंद्र आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: