कॅरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सामान्यपणे वापरला जाणारा कॅरम बोर्ड

कॅरम हा जगातील (विशेषत: भारतातील) एक लोकप्रिय बैठा खेळ आहे. ह्या खेळात एकावेळी कमाल ४ खेळाडू भाग घेऊ शकतात. कॅरम बोर्ड हा लाकडापासुन बनवलेला चौरसाकृती पृष्ठभाग असतो, ज्याच्या ४ कोनाड्यांजवळ मोठी गोल छिद्रे असतात. स्ट्रायकर नावाची जड सोंगटी वापरुन इतर हलक्या गोल सोंगट्या ह्या गोल छिद्रांमध्ये ढकलणे हे ह्या खेळाचे उद्दिष्ट आहे.

कॅरममधील सोंगट्या

कॅरम खेळात ९ पांढऱ्या, ९ काळ्या व १ गुलाबी (राणी वा क्वीन) अशा १९ सोंगट्या असतात. ह्या सोंगट्या व स्ट्रायकरचे कॅरम बोर्डवर होणारे घर्षण कमी करण्याकरिता पातळ बोरिक पावडर वापरली जाते.