कुलवृत्तान्त
Appearance
कुलवृत्तान्त किंवा कुळवृत्तांत हे एका उपनामाच्या किंवा कुटूंबाच्या समूहातील लोकांचा माहितीचा कोश असतो. एकप्रकारे कौटुंबिक इतिहासाचे संकलन यामार्फत केले जाते. मराठीत असे कुलवृत्तान्त अनेक परिवारांनी संकलीत करून प्रकाशित केले आहे. यात सर्वसाधारणपणे कुळाच्या मूळ व्यक्तिपासून आज पर्यंत झालेल्या व्यक्तीची नावे, माहिती, त्याचे लग्न संबंध, मूळ गावे, वास्तव्याची ठिकाणे आणि इतर आवश्यक माहिती वंशावळीसह असते.
मराठी कुलवृत्तान्त
[संपादन]- खरे कुल वृत्तान्त - संपादक व प्रकाशक - मोरो हरी खरे, पुणे, शके १८६२
- चितळे कुल वृत्तान्त (चितळे, अत्रिगोत्री जोशी व मोने या कुलांचा वृत्तान्त) - संपादक व प्रकाशक - वासुदेव लक्ष्मण चितळे, नागपूर, १९३७
- मोडक कुल वृत्तान्त पुरवणी - संपा. कृष्णाजी विनायक पेंडसे , प्रकाशक - अन्नपूर्णाबाई खरे, पुणे, शके १८७०
- नित्सुरे कुल वृत्तान्त - गणेश बालकृष्ण नित्सुरे , प्रकाशक - मोरो हरी खरे, पुणे, १९४७
- चित्तपावन वासिष्ठ गोत्री गोगटे कुलवृत्तान्त - संपा. व प्रकाशक - सदाशिव गोविंद गोगटे व इतर , १७७२
- चित्पावन काश्यपगोत्री ठोसर व बेंद्रे व भारद्वाजगोत्री ठोसर यांचा ठोसर कुलवृत्तान्त - संपा. व प्रकाशक - रामचंद्र महादेव ठोसर , १९६३
- पेंडसे कुल वृत्तान्त - कृष्णाजी विनायक पेंडसे, १९३८
- पेंडसे कुल वृत्तान्त खंड २ - कृष्णाजी विनायक पेंडसे, १९४९
- दातार कुल वृत्तान्त - श्रीधर हरी दातार फडणीस
- बापट कुल वृत्तान्त (घारे कुलासह) - रामचंद्र बापट, विष्णू बापट, १९५७
- गणपुले कुल वृत्तान्त - परशुराम बळवंत गणपुले , १९५३
- सोहोनी कुल वृत्तान्त
- साठे कुल वृत्तान्त
- नातू कुलवृत्तान्त
- भानू कुल वृत्तान्त
- आठवले कुलवृत्तान्त
- सोमण कुल वृत्तान्त
कुळ तथा घराणी इतिहास ग्रंथ
[संपादन]- मराठा कुळांचा इतिहास, भाग १ - जाधव घराण्याची कैफियत - गोपाळ दाजीबा दळवी, १९१२
- मराठा कुळांचा इतिहास, भाग २ - साळुंखे उर्फ पाटणकर व अंकलीकर शितोळे घराण्यांच्या कैफियती - गोपाळ दाजीबा दळवी, १९१२
- मराठा कुळांचा इतिहास, भाग ३ - चव्हाण उर्फ डफळे, ढवळचे पवार, म्हसवडचे माने, मोरे उर्फ धुळप व खळतकर देशमुख ह्या घराण्यांच्या कैफियती - गोपाळ दाजीबा दळवी, १९१३
- अणजूरकर नाईक घराण्यांचा साद्यंत इतिहास (इ.स.११२८-१९६४) - गजानन गोविंद नाईक , १९६४
- वाठारकर निंबाळकर यांचे घराण्याचा इतिहास - नीळकंठराव पांडुरंगराव नाईक निंबाळकर, १९२८
- कुलाबकर आंग्रे सरखेल : आंग्रे घराण्याचा इतिहास - दामोदर गोपाळ ढबू भट , शक १८६१
- ओक घराण्याचा इतिहास - भगवान प्रभाकर ओक , १९७६
- आठल्ये घराण्याचा इतिहास , १९४८
- अष्टागरातील क्रमवंत घराण्याचा इतिहास - दामोदर गणेश टिल्लू , १९२८
- हिंदुस्थानातील गोखले व गोखले रास्ते घराण्याचा इतिहास - गोविंद विनायक आपटे , १९२२