Jump to content

कुऱ्हाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुर्‍हाड या पानावरून पुनर्निर्देशित)
झाडे तोडण्याची कुऱ्हाड

कुऱ्हाड (इंग्लिश: Axe, अ‍ॅक्स ;) हे मानवी इतिहासात अनेक सहस्रकांपासून झाडे/लाकूड तोडण्यासाठी वापरले जाणारे एक अवजार, तसेच एक शस्त्र आहे. याचा विशेष समारंभांमध्ये, तसेच मानचिन्हांमध्ये मानाचे प्रतीक म्हणूनदेखील कुऱ्हाड मिरवली जाते. संरचनेनुसार कुऱ्हाडीचे अनेक प्रकार आढळतात; मात्र सहसा सर्व कुऱ्हाडींना हातांत धरायला एक लांब लाकडी दांडा व त्याच्या अग्राला लावलेले धातूचे, सहसा लोखंडी किंवा पोलादी पाते असते. हिच्या वापराच्या रीतीतही सर्वत्र समानता आढळते; जिच्यात दोन्ही हातांनी दांडा धरून, खांद्यांतून हात झोकून लक्ष्यावर कुऱ्हाडीच्या पात्याचा वार केला जातो.लाकडी दांड्यामुळे, कुऱ्हाड लाकडावर वापरतांना, बसणारे हादरे बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

कुऱ्हाडीस ऋग्वेदात वाशी असे म्हणले आहे.[]

म्हण

[संपादन]

'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' अशी एक म्हण आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [ॠग्वेद, ॠचा क्रमांक ८.२९.३]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत