कुंवर नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुॅंवर नारायण
जन्म नाव कुॅंवर नारायण
मृत्यू १५ नोव्हेंबर २०१७
राष्ट्रीयत्व भारत भारतीय

कुॅंवर नारायण (जन्म : १९ सप्टेंबर, १९२७ - - १५ नोव्हेंबर २०१७) हे एक हिंदी साहित्यकार आहेत.

इ.स. १९५० सालापासून कुॅंवर नारायण यांनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्‍न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे भारतीय व विदेशी भांषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

कुॅंवर नारायण हे विविध सांस्कृतिक संस्थांशी जोडले गेले आहेत.

कुॅंवर नारायण यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • अपने सामने (कविता)
 • आकारों के आसपास (कथासंग्रह)
 • आज और आजसे पहले (समीक्षा/वैचारिक)
 • आत्मजयी (खंडकाव्य)
 • इन दिनों (कविता)
 • कोई दूसरा नही (कविता)
 • चक्रव्यूह (कविता)
 • तीसरा सप्तक (कविता)
 • परिवेश (कविता)
 • मेरे साक्षात्कार (समीक्षा/वैचारिक)
 • वाजश्रवा के बहाने (काव्य)
 • साहित्य के कुछ अंतर्विषयक संदर्भ (समीक्षा/वैचारिक)
 • हम-तुम (कविता)

कुॅंवर नारायण यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

 • कुमारन आशान पुरस्कार
 • पद्मभूषण पुरस्कार (२००९)
 • प्रेमचंद पुरस्कार
 • मेडल ऑफ वॉर्सा युनिव्हर्सिटी (पोलंड)
 • राष्ट्रीय कबीर सन्मान
 • रोमचा आंतरराष्ट्रीय प्रमिओ फेरोनिआ पुरस्कार
 • व्यास सन्मान
 • शलाका सन्मान
 • साहित्य अकादमी पुरस्कार
 • ज्ञानपीठ पुरस्कार (२००५)