कुंडिकोपनिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे उपनिषद् सामवेदाशी संबंधित आहे. या उपनिषदाच्या पहिल्या तेरा मंत्रांमध्ये गृहस्थ म्हणून जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर संन्यास आश्रमात प्रवेश आणि त्यामधील जीवनचर्या यांची चर्चा केलेली आहे. त्यानंतर संन्याशाच्या अंतर्मुखी साधनांचा उल्लेख केलेला आहे. असे म्हटले आहे की आधी जप-ध्यानाच्या माध्यमातून ब्राह्मी चेतनेच्या अवतरण प्रक्रियेचा बोध करून घ्यावा आणि सर्वत्र त्या आत्मचेतनेच्या रूपाचा अनुभव करावा. त्यानंतर तन्मात्रांच्या संयमाद्वारे अनाहत नादाच्या माध्यमातून जीव चेतनेच्या उन्नयनाची साधना करावी. साधनेच्या या विशिष्ट क्रमाचा स्पष्ट उल्लेख या उपनिषदात केला गेलेला आहे.